आदर्श विद्यालय चिखली येथे शाळा प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न



नितीन फुलझाडे 

चिखली:- स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे दिनांक २३ जुलै ला विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले सर यांच्या अध्यक्षतेखाली  शाळा प्रवेशोत्सव व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर विद्यालयाचे उपप्राचार्य भगवानराव आरसोडे पर्यवेक्षक द्वय श्रीपाद दंडे, लक्ष्मीकांत शेटे, प्रकाश तायडे, पालक प्रतिनिधी श्याम वाकदकर तसेच पत्रकार विनोद खरे माता-भगिनी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाची सजावट करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पालकांसोबत फोटो घेण्यासाठी सेल्फी पॉईंट तसेच आकर्षक वर्ग सजावट करण्यात आली होती. यावेळी प्राथमिक स्वरूपामध्ये व्यासपीठावर विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ ,पाठ्यपुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .तसेच प्रत्येक वर्गामध्ये वर्ग शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली होती वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, पेन देऊन त्यांचे स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 


        यावेळी आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना प्राचार्य सतीश गव्हले सर यांनी नवीन शैक्षणिक क्षेत्रासाठी शुभेच्छा दिल्या तसेच पालकांनी ज्या उद्देशाने आणि ज्या विश्वासाने आमच्या शाळेत प्रवेश घेतला तर तो विश्वास येणाऱ्या काळामध्ये आम्ही सार्थ ठरवू असे आश्वासन सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने पालकांना दिले. यामध्ये पुस्तक वितरण विभाग प्रमुख थोरात सर व वाघ सर यांनी पुस्तक वितरीत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका मंजुषा  फीतवे तर आभार प्रदर्शन शिक्षिका अर्चना कंगले यांनी केले .सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचारी तसेच पालक बंधू भगिनी उपस्थित होते. 

Previous Post Next Post