नितीन फुलझाडे
जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठान चिखली च्या वतीने मंगळवार २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम तीन पूजनीय सरसंघचालक यांच्या जीवन चरित्र तसेच त्यांच्या कर्तुत्वाची यशोगाथा असलेले 'संघ गंगा के तीन भगीरथ' हे हिंदी नाटक चिखली येथील मौनीबाबा संस्थान च्या सभागृहात होणार आहे.
ही कथा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या तीन सरसंघचालकांची,कर्तृत्वाची, राष्ट्रीय नेतृत्वाची.त्यांच्या इतक्या कमी वेळेत तिघांचेही जीवन चरित्र पूर्ण रूपाने मांडणे अशक्यच आहे. काही प्रमुख प्रसंगाचे नाट्यमय सादरीकरण आणि कथानक मांडतांना भारतमातेची प्रस्तावना देत देत नाटक पुढे सरकते.
पहिल्या अंकात प्रस्तावने सोबत डॉ. हेडगेवारजी यांचे बालपण, वंदेमातरम् चा प्रसंग,काँग्रेस अधिवेशनापूर्वीची स्थिती, संघ स्थापनेचा संकल्प, संघकार्याचा विस्तार, महात्मा गांधी आणि डॉ. हेडगेवारांची भेट, डॉ. हेडगेवार यांचे क्रांती कार्य, काँग्रेस कार्य आणि सरसंघचालक या नात्याने या कार्याची स्पष्टता आहे.
.दुसऱ्या अंकात प्रस्तावनेसह श्री गुरुजीं चे सारगाछी येथील जीवन, अखंडानंदासोबतचा संवाद, नागपूरचा परतीचा प्रवास, डॉ. हेडगेवारांची भेट, डॉ. हेडगेवारांचे शेवटचे भाषण, गुरुजींची सरसंघचालक म्हणून नियुक्ती.
सरदार वल्लभभाई पटेलांसोबत गुरुजींचा संवाद, काश्मीर भारत विलीनीकरण, संघावरील बंदी, बाळासाहेब देवरसांची सरसंघचालक म्हणून निवड, आणिबाणीतील सत्याग्रह, रामजन्मभूमी आंदोलन आदी प्रसंग आहेत.पू. गुरुजी आणि पू. बाळासाहेब देवरस यांच्या जीवन चरित्राचा परिचय यातून होतो.
१८८९ ते १९९६ या १०७ वर्षांचा कालखंड या तीन महान विभूतींच्या जीवनातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या नाट्यातून केला आहे.
१८८९ ते १९९६ या १०७ वर्षांचा कालखंड या तीन महान विभूतींच्या जीवनातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या नाट्यातून केला आहे.
संघाचे कार्य गेली १०० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. हा सतत वाहणारा प्रवाह आहे अर्थात 'गंगे' प्रमाणे निरंतर वाहतो आहे म्हणून याला आम्ही 'संघगंगा' म्हणतो आणि ही प्रवाहित ठेवणारे हे तीन भगीरथ आहेत. ही भगीरथ परंपरा संघात कायम सुरु आहे. या कार्याचे दर्शन प्रेक्षकांना व्हावे असा नाटकाचा प्रयत्न आहे.राधिका क्रिएशन्स, नागपूर यांची निर्मिती असलेल्या या नाटीकेच्या माध्यमातून संघ व संघ कार्य प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत आहे. चिखलीत प्रथमच होणाऱ्या या निशुल्क नाटकाचा चिखलीकर नाट्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठान चिखली च्या वतीने करण्यात आले आहे.
