सैनिकांच्या सुरक्षेसाठी चिखली नॅझरीन चर्चमध्ये प्रार्थना...
नितिन फुलझाडे: आपण सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहात कारण देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र सजग असतो. आपण सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान केला पाहिजे. देशासाठी काहीतरी करण्याची जाणीव प्रत्येक नागरिकाच्या मनात असायला हवी.सैनिकाचे जीवन हे त्याच्या कुटुंबासाठी, समाजासाठी, आणि देशासाठी बलिदान असते. एका सैनिकाचे बलिदान हे केवळ त्याचे जीवन देण्यात नाही, तर त्याच्या स्वप्नांचा, इच्छांचा आणि व्यक्तिगत सुखांचा त्याग करण्यातही असते. जेव्हा सैनिक आपल्या सर्व सुखांचा त्याग करून तिथे आपल्यासाठी उभा आहे तेव्हा त्याचे सुरक्षा व मनोबल वाढवण्यासाठी आपण परमपित्याला ईश्वराला प्रार्थना तर नक्कीच करू शकतो या शब्दांमध्ये आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी सैनिका प्रति असलेल्या त्यांच्या संवेदना बोलून दाखवल्या.
सध्या सुरु असलेल्या भारत -पाकिस्तान युद्धा मध्ये सिमेवर लढत असलेल्या आपल्या भारतीय जवानांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांचे मनोबल वाढवन्यासाठी आज दी.११/५/२०२५ रविवारी रोजी चर्च ऑफ दि नॅझरिन येथे रेव्ह. सचिन अर्जुन गायकवाड आणि आ.सौ.श्वेताताई महाले पाटिल यांच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात येणार आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, युवराज भुसारी, सचिन कोकाटे महेश लोणकर व इतर ख्रिश्चन बंधू-भगिनी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
आपली चिखली