*कॅफे सेंटर झाले अश्लीलतेचे अड्डे*

 



*अल्पवयीन विद्यार्थी होत आहेत शिकार*

नितीन फुलझाडे

चिखली:-  मम्मी पप्पा मी क्लासला चालले/ चाललो म्हणून धूम ठोकणाऱ्या अल्पवयीन तथा युवा वर्गाने अभ्यासाच्या नावाखाली कॅफे सेंटर किंवा इतर लॉजच्या ठिकाणी आपले आंबट शोक पूर्ण करण्यासाठी सहारा घेणे योग्य नसून आपला पालक वर्ग आपल्यासाठी काय भविष्य घडविण्याची स्वप्न बघतोय याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. 

       चिखली शहरात कॅफे सेंटर नाश्ता कॉर्नर च्या नावाखाली अवैध अश्लील कॅफे सेंटरचा धुमाकूळ माजला असून याचा फायदा काही आंबट-शौकीन ,अल्पवयीन तथा युवा वर्ग घेत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच घटना आज सकाळी आठ वाजे दरम्यान शिंदे हॉस्पिटल जवळ असलेल्या एका कॅफेमध्ये घडली. ज्यामध्ये मुली घरी क्लासला जायचं सांगून अशा ठिकाणी दोन अल्पवयीन युवकांसोबत आढळून आल्या मुली देखील 14 व 15 वर्षाच्या दरम्यान होत्या याबाबत चिखली पोलिसांनी ताबडतोब कार्यवाही करून संबंधितांना याबाबत सूचना केल्या व असे कृत्य यानंतर होणार नाही याबाबत त्यांचे जबाब नोंदवून त्यांना सोडून दिले. तसेच कॅफे चालक याला देखील अल्पवयीन मुले,मुली कॅफेमध्ये बसणार नाही याबाबत तंबी दिली. तरी पालकांनी आपला पाल्य शिकवणी वर्गाला,क्लासला जात आहे काय! आपल्या शिकवणी क्लास च्या नावाखाली असे गैर कृत्य करत आहे काए याबाबत पालक व शिकवणी वर्गातील शिक्षक यांनीही सतर्कता ठेवावी.

     अशा प्रकारचं गैरकृत्यांमुळे कुटुंब व्यवस्था व समाज व्यवस्थेवर मोठे दुष्परिणाम होत आहेत. याला जबाबदार असणाऱ्या  कॅफे सेंटर व लॉजवर कार्यवाही व्हावी अशी पालक वर्गाकडून ओरड होत आहे. तरी पोलीस प्रशासन सज्ज असून याबाबत पुढील भूमिका काय घेण्यात येते हे पहावे लागेल.

Previous Post Next Post