चिखली जलतरण तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू...

*चिखली: शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे असलेल्या रेनबो स्विमिंग पूल मध्ये सु.रा.चुनावाले विद्यालय (बी एम एस कॉलेज) येथील द्वितीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सायंकाळी सहा ते साडेसहा वाजे दरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.*
     *सविस्तर असे की, तालुका क्रीडा संकुलामध्ये रेनबाे स्विमिंग पूल असून तेथे उन्हाळ्मयाध्ये पाोहणाऱ्यांची खूप गर्दी असते. या स्विमिंग पूल मध्ये सायंकाळी सहा वाजे दरम्यान सदर घटना घडली. मृतकांमध्ये विवेक वायले (23) राहणार पाथर्डी तालुका अकोला व सुरज पानखडे (21) रा. गेवराई तालुका बीड हे दोन विद्यार्थी असल्याचे समजते. सदर युवकांना तात्काळ स्थानिक भराड हॉस्पिटल येथे नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस स्टेशनचे ठाणेदारसह चमू तात्काळ पोहोचले हाेते.  मृतक विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. संबंधित मृतक विद्यार्थ्यांच्या पालकांना या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाने कळवली आहे.*

मृतक...
विवेक वायले 

मृतक...
सुरज पानखडे 

*या खळबळ जनक घटनेने पुढील काही प्रश्न निर्माण होतात*

* या निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण*

* या घटनेने जलतरण तलाव चिखली येथे पोहण्यासाठी जाणे कितपत सुरक्षित आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे* 

* पोहण्यासाठी आलेल्या विद्यार्थी, बालक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करणे कोणाचे काम? सदरील उपाय योजना केलेली आहे किंवा नाही याबाबत शहानिशा करणे कर्मचारी,अधिकारी वर्गाचे काम असून याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे*

* तसे पाहिल्यास जलतरण तलाव  तालुका क्रीडा संकुल येथे असून तो कंत्राटी पद्धतीने दिल्या जातो त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची हाही प्रश्न निर्माण होतो.*

* हे विद्यार्थी जेव्हा जलतरण तलावामध्ये बुडाले त्यावेळेस तेथे लाईफ गार्ड होते का?*

* जलतरण तलावात पोहणे शिकविण्यासाठी असणारे प्रशिक्षक हजर होते का?*

*असे एक ना पुष्कळ प्रश्न निर्माण होतात, पोलीस प्रशासन याबाबत अधिक तपास करेलच परंतु हलगर्जीपणा म्हणा किंवा चूक दोन निष्पाप विद्यार्थ्यांचा या घटनेत मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तसेच चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे*
Previous Post Next Post