ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी विवेक पवळ



            बुलढाणा जिल्ह्यातील दे  माळी येथे पदाधिकारी तथा सर्व तालुका पदाधिकारी यांची संयुक्त बैठक दी.12 एप्रिल रोजी  राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर, राज्यसहसचिव नागसेन खंदारे, हिंगोली जिल्हाध्यक्ष भारत धवसे, राज्य मार्गदर्शक रामेश्वर गायकी, यशवंत इंगळे, अनिरुद्ध सरोद ,गणेश भाकडे, जिल्हा उपाध्यक्ष, गणेश बांनाईत, जिल्हा सहसचिव,प्रमोद पिसे, जिल्हा कोषाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे पार पडली. सदर बैठकीत संघटनात्मक  विषयावर सविस्तर चर्चा होऊन  ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी विवेक पवळ,कार्याध्यक्ष अमित डिवरे , जिल्हा मार्गदर्शक किसन अवसरमोल,जिल्हा सचिव भरत सूपेकर यांची चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली. यावेळी सर्व तालुका अध्यक्ष , उपाध्यक्ष सचिव हजर होते. बैठक यशस्वीतेसाठी मेहकर तालुका अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष देऊळगाव माळी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विवेक पवळ हे धोत्रा भनगोजी येथील ग्रा.प. शिपाई असून त्यांच्या या जिल्हाध्यक्ष पदाबाबत सर्वच स्तरातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post