चिखली निमा शाखेतर्फे 78 वा निमा डे उत्साहात साजरा



 *जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र कमळसकर यांच्याकडे प्रेसिडेंट, मेंबरशिप ड्राइव्ह कमिटी, निमा महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त पदभार.*

काल दिनांक 15 एप्रिल रोजी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ( NIMA ) चिखली द्वारा मान्यवरांच्या उपस्थितीत चिखली मेडिकल असोसिएशन च्या ( CMA ) हॉल येथे निमा डे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व भगवान धन्वंतरींना वंदन करून दीप प्रज्वलनाने झाले.

 नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ( NIMA ) या संघटनेची स्थापना दिनांक 13 एप्रिल 1948 रोजी झाली असून निमा संघटना ही आयुर्वेद व युनानी ( ISM) डॉक्टरांच्या न्याय हक्का संदर्भात काम करणारी संघटना असून ती देशपातळीवर काम करते. दरवर्षी 13 एप्रिल हा निमा डे म्हणून साजरा केला जातो. यावेळी निमा डे साजरा करण्यात आला  त्यासाठी काही विशेष मान्यवरांची उपस्थिती होती. त्यामध्ये डॉ. गजानन पडघान केंद्रीय निमाचे उपाध्यक्ष, डॉ. सौ. वैशाली पडघान निमा वुमन्स फोरमच्या केंद्रीय अध्यक्षा, डॉ. सोपान खर्चे महाराष्ट्र निमाचे कोषाध्यक्ष, डॉ. रविंद्र वाघमारे, डॉ सौ. प्रिया वाघमारे आणि डॉ. आशुतोष गुप्ता यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिखली निमा शाखेचे सचिव डॉ. सुनिल केवट यांनी केले.

कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे समयोचित मार्गदर्शन झाले. सर्व मान्यवरांनी संघटनेचे महत्त्व विशद केले आणि संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आवाहन केले. यावेळी डॉ. गजानन पडघान व डॉ. सोपान खर्चे यांनी डॉ. रविंद्र कमळसकर यांची जिल्हाध्यक्ष पदावर बढती झाली त्यासाठी त्यांचा सत्कार केला व संघटने प्रति त्यांच्या कार्याची दखल घेऊन  त्यांना प्रेसिडेंट, मेंबरशिप ड्राईव्ह कमिटी, निमा महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त पदभार सोपवला.

कार्यक्रमाला डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. संजय लोखंडे व डॉ. ईर्शाद खान यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन निमा चिखलीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार मोळवणे यांच्या मार्गदर्शनात केल्या गेले.

यावेळी चिखली निमा वुमन्स फोरमची समिती स्थापन करण्यात आली आणि मान्यवरांनी त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्यात. समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. राखी लद्दड, सचिव पदी डॉ. सौ उज्वला मेहेत्रे व कोषाध्यक्ष पदी डॉ. सौ. प्रतीक्षा वायाळ यांची निवड झाली.

कार्यक्रमादरम्यान ज्या डॉक्टर मंडळींच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले त्या पाल्यांसह डॉक्टरांचाही हृदय सत्कार करण्यात आला. 10 एप्रिल रोजी सुनिल रामसिंह चुनावले आयुर्वेद महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी विवेक वायले आणि सुरेश पानखेडे यांचा जलतरण तलावामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांना सुद्धा चिखली निमा संघटनेतर्फे यावेळी श्रद्धांजली अर्पण केली गेली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. स्वप्निल मेहत्रे, डॉ.अशोक लद्धड, डॉ.गोपाल लोखंडे, डॉ. गजानन वायाळ, डॉ. अरुण कुटे, डॉ.चित्तरंजन रिंढे, डॉ. आरिफ बेग, डॉ.पंढरी इंगळे, डॉ. रवि मोरे, डॉ. संतोष सोमटकर, डॉ. प्रसाद निकम, डॉ. विष्णू गिरी, डॉ. मनोज चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. विलास महाजन यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सौ. प्रतिक्षा वायाळ यांनी व आभार प्रदर्शन डॉ. सौ. अरुणा लोखंडे यांनी केले.

कार्यक्रमासाठी चिखलीचे सर्व निमा सदस्य डॉक्टर मंडळींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता सुरुची  भोजनाने झाली.
Previous Post Next Post