चिखली येथे शासकीय कामात अडथळा व मारण्याची धमकी...





चिखली: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शासकीय कामात अडथळा आणून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात दि. 31 जानेवारी 2025 ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कु. ज्योती आंबादास मोरे (वय 44 वर्षे) ह्या दिवाणी व फौजदारी न्यायालय, चिखली येथे बेलीफ म्हणून कार्यरत आहेत. मानिय चिखली न्यायालयाच्या आदेशानुसार, त्या 31 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता इतर कर्मचाऱ्यांसोबत सैलानी नगर येथे एका प्लॉटचा ताबा देण्यासाठी गेल्या होत्या.
दुपारी 2 वाजताच्या सुमारास, ताबा पावती बनवत असताना, फौजन हुसेन जाकीर हुसेन (वय 30 वर्षे) नावाचा व्यक्ती तिथे आला. त्याने कु. मोरे यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून फाडली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच, त्याने तिथे उपस्थित इतर वाद्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर, कु. मोरे यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फैजान हुसेन जाकीर हुसेन यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 132 शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,351(2),352, धमकी देणे, गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितिन सिंह चौहान साहेब थानेदार संग्राम पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनात करीत आहे.
Previous Post Next Post