जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न झाला रक्तदान महायज्ञ..

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांमार्फत 
 दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते प्रति वर्षाप्रमाणे दिनांक 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत रक्तदान महा यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल, ॲनिमिया, थँलेसिमिया, हिमोफिलीया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त प्रमाणात आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केले आहे.
 यावर्षी सुद्धा " जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज " यांनी शासनाच्या रक्तपेढ्यांना एक लाख रक्तकुपिका देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी संपूर्ण देशभरात एक हजार पेक्षा जास्त रक्तदान शिबिर आयोजित केले जाणार आहेत.
         चिखली शहर जिल्हा बुलढाणा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दि. 4/1/2025 रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले, या शिबिरात एकूण 46 रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या. 
           यामध्ये विशेष असे की, या दोन दिवसामध्ये आतापर्यंत 306 रक्तदान शिबीर झालीत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला 35 हजाराचे वरती रक्तकुपिका संकलित करून महाराष्ट्र शासनाला सुपूर्द करण्यात आल्या.
          चिखली शहरातील रक्तदान शिबिराचे उदघाट्न उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. उमेश सावजी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी श्री अंकुशराव पडघान यांनी सुद्धा भेट दिली. तसेच श्री दिपक चिंचोले उपपीठ इंजिनिअर, श्री राऊत भाऊ ता प्र सौ राऊतताई, सौ गायकवाडताई म. प्र, किशोर राऊत, श्री काकडे कंत्राटदार, श्री कड अभियंता, श्री येवले सर, श्री लंबे सर, डॉ फारुख साहेब, श्री सुरडकर कंत्राटदार व सर्व संप्रदायातील आजी माजी पदाधीकारी हजर होते.
Previous Post Next Post