महाराष्ट्र अंनिसचे राज्य अधिवेशन आळंदी पुणे येथे होणार..

अकोला-- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समितीच्या स्थापनेच्या 35 वर्षेपूर्ती निमित्ताने दि. 27, 28 व 29 डिसेंबर 2024 ला संविधान जागर राष्ट्रीय परिषद आणि संघटनेचे राज्य अधिवेशन आळंदी पुणे येथे  आयोजित केले असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी दिली.
      अशोक वाटिका येथे महाराष्ट्र अंनिस अकोला जिल्हा शाखेच्या  बैठकीस मार्गदर्शनप्रसंगी बोलत होते.27 डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय संविधान परिषदेचे उद्घाटन खुदाई खिदमतगार संघटनेचे  फैजल खान नवी दिल्ली यांचे हस्ते , अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  व माधव बावगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या निमित्ताने आयोजित परिसंवादात मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड मुंबई , लेखक  संजय आवटे पुणे, मानवाधिकार कार्यकर्ते  मार्टिन मकवाना अहमदाबाद, खालील अंसारी बेंगळुरू , ॲड.रमा सरोदे पुणे इत्यादी मान्यवर  मार्गदर्शन करणार आहेत. 28व29 डिसेंबर रोजी संघटनेचे राज्यातील  जुने- नवीन कार्यकर्ते चळवळीच्या 35 वर्षातील कृतिशील कार्यावर चिंतन मंथन करणार असल्याची माहिती राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड यांनी दिली.
     अधिवेशनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. अंनिसच्या बुवाबाजी विरोधी आघाडी प्रमुख  पी.टी. इंगळे यांचा  राष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल नारी ललकारचा विशेषांक देऊन सन्मान करण्यात आला.
      बैठकीस जिल्हाध्यक्ष अर्जुनराव गुडधे, पंजाबराव वर, श्रीकृष्ण माळी, तुषार हांडे, संजय इंगळे किनखेड ,एडवोकेट अंजली हिवाळे, एडवोकेट रंजना तायडे, सर्पमित्र बाळ काळणे, संघपाल शिरसाठ ,अविनाश बाबुराव भगत, एडवोकेट सतीश तायडे, राजेश वानखडे, साहेबराव इंगळे गुरुजी, प्रा. राहुल इंगळे ,मनीष खडसे, सुनील शिरसाठ, विद्या राणे यांचे सह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित  होते.'हम होंगे कामयाब'या प्रेरणा गीताने बैठकीची सांगता झाली.
Previous Post Next Post