चिखलीचे युवा पत्रकार छोटू कांबळे यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक


बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते पत्रकार छोटू कांबळे यांचा सत्कार

बुलढाणा :- नुकतीच विधानसभा निवडणूक 2024 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अनोखी स्पर्धा व्हाईस ऑफ मीडिया आणि बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातून अचूक अंदाज वर्तवणाऱ्या पत्रकारांना बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघाचे अचूक अंदाज वर्तवून तृतीय क्रमांक पटकावणारे चिखली येथील युवा पत्रकार तथा दैनिक आम्ही चिखलीकर संपादक छोटू कांबळे यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते सत्कारपूर्वक देण्यात आले. 
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिलजी मस्के, मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेंद्रजी काळे, व्हाईज ऑफ मीडिया बुलढाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मणजी बगाडे , सकाळ जिल्हा प्रतिनिधी अरुणजी जैन, सिद्धार्थजी आराख उपस्थित होते. 
Previous Post Next Post