शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अजीम खान तर उपाध्यक्ष पदी गणेश बोर्डे...

स्थानिक श्री. राजाभाऊ बोंद्रे नगर परिषद माध्यमिक व उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली येथील शाळा व्यवस्थापन समिती ची निवड प्रक्रिया दि. 11 डिसेंबर रोजी संपन्न झाली. या समितीच्या अध्यक्ष पदी अजीम खान राजदर खान तर
उपाध्यक्ष  म्हणून गणेश रमेश बोर्डे यांची निवड करण्यात आली आहे. 
       अध्यक्ष पदासाठीचे उमेदवार 
अझीम खान यांना ६ मते मिळाली. निवड प्रक्रियेत सहभागी झालेल्या महिलांपैकी अध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या महिलेला ४ मते मिळाली तर सलीम परवेज यांना १ मत मिळाले. एकूण सदर निवड प्रक्रिया ही चुरशीची झाली. 
       वर्ग ६ ते ८ मधील पालकांनी या निवड प्रक्रियेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळा व्यवस्थापन समितीच्या इतर सदस्यांमध्ये प्रामुख्याने सलीम परवेज खान अ. सत्तार, शेख जावेद शेख करामत,  रईसा बी मजीद खान, असामा परवीन शेख सलीम, नजेमा परवीन दिलषाद अली, रुबीना बी सैय्यद शगीर, रमेश भुजंगराव अंभोरे, वर्षा गणेश बोर्डे,
लक्ष्मी देवेद्र भोंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
Previous Post Next Post