बुलडाणा, (जिमाका) दि. 22: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा कार्यक्रमानुसार जिल्ह्यात दि.23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी खुल्या, मुक्त तसेच निर्भय वातावरणात, शांततेत पार पाडण्याकरिता लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी ) तसेच मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
आदेशानुसार दि.23 नोव्हेंबर, मतमोजणीचा संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व सर्व देशी दारु विक्री, विदेशी मद्य विक्री, परमिट रुम, बिअर बार, बिअर शॉपी, (सीएल-2, सीएल-3, एफएल-2, एफएल-3, फॉर्म इ, एमएलबिआर-2 इ.) विक्री परवाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाचा भंग करतील त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंद कायदा 1949 चे कलम 54 (सी) नुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
Tags
ALERT...