चिखली-
शेतकऱ्याचे सुखदुःख जाणून घ्यायचे असेल तर शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यावं लागतं. दिवसभर शेतात काम करून सायंकाळी शेतकरी राजा झोपतो तेव्हा शेतातल्या उभ्या पिकाच काय होईल या विचाराने त्याला झोप लागत नाही. शेतकऱ्याचे सुखदुःख स्वतः जाणून असलेल्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला बंडू याला चिखली विधानसभा मतदार संघाची मनसेने उमेदवारी दिली आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. स्वतःचे आई वडील शेतकरी असल्यामुळे त्यांचे बालपण शेतातच राब राबण्यात गेलं. परिस्थितीला अनुरूप संघर्ष करण्याची वृत्ती त्यांच्यात रुजली. आज गणेश ऊर्फ बंडू बरबडे हे राजकारणात सक्रिय असून तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबतीला घेऊन कष्टकऱ्यांच्या हितासाठी अनेक आंदोलने करीत ते शाखाध्यक्ष पदावरून जिल्हाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले आहे. शेतात नांगरणी, फवारणी, निंदण्यापासून काडी कचरा, पुंजे उचलून पीक काढणीपर्यंत शेतातली सगळी कामं त्यांनी स्वतः केली असून शेतकऱ्यांचे हित कशात आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे.
यापूर्वीचे असलेले आजी-माजी आमदार हे कधी एखाद्या पक्षाचे शाखाध्यक्ष झाले नाही तर कधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी एखादं हिताचं काम केलं नाही त्यांच्या संघटनेमध्ये त्यांना केवळ आयात केलं गेलं आणि त्यांनी पैशाच्या जोरावर आमदारकीचे तिकीट मिळवलं. शेतात राबण काय असतं हे त्यांना काहीच माहिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं सुख दुख त्यांना काय समजणार... शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखविणाऱ्या माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी कोट रुपयांचे कर्ज काढून शेतकऱ्यांच्या कष्टाची जिल्हा केंद्रीय बँक बुडवली. तर सत्तेत असणाऱ्या आमदार श्वेता महाले यांनी भक्ती महामार्गासारखा जबरदस्तीचा मार्ग स्वतःच आणायचा, नवीन शहर विकास आराखडा करून शेतकऱ्यांच्या जमिनीवर ग्रीन झोन, पार्किंग सारखे वेगवेगळे आरक्षण स्वतः च टाकायचे, एम.आय.डी.सी च्या हद्दवाढ नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच अधिग्रहण करायच्या, सुपीक जमीन बळकावून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय द्यायचा आणि मग जमिनी अधिग्रहण करणे थांबवण्यासाठी, रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायचे. हा कसला शेतकऱ्यांबद्दल कळवळा म्हणजे, चाबकाने मारायचं ही तुम्हीच आणि मलम लावायचा ही तुम्हीच.. वारे वा सरकार तुमचंच असुन शेतकऱ्यांबद्दल असे निर्णय घेताच कशाला असा सवाल बंडू बरबडे यांनी उठविला.
चिखली विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश उर्फ बंडू श्रीराम बरबडे यांनी प्रचाराला सुरुवात करताच गाव खेड्यापाड्यातून शेतकरी बांधवांसह सर्व समाज घटकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिक, सर्व जाती धर्माचे मतदार, शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी, कामगार, शेतकरी, मजूर , लहान मोठे व्यापारी या सर्व घटकांचे त्यांच्या उमेदवारीला समर्थन देत आहे. शेतकरी तरुण उच्च शिक्षित, शांत संयमी, विनम्र स्वभावामुळे सर्व स्तरातील मतदारांचे त्यांना चांगले पाठबळ मिळत आहे. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा संगम असलेला कार्यक्षम उमेदवार बंडू बरबडे यांच्या बद्दल हजारोंच्या संख्येत असलेल्या मतदारसंघातील शेतकरी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचा शेतकऱ्याच्या पोराला मात्र चांगला आशीर्वाद मिळत आहे.