केळवद सर्कलमध्ये श्वेताताईंच्या जन आशीर्वाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद




         चिखली : सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे प्रचार जोरात सुरू आहे.  चिखली मतदारसंघात देखील महायुतीच्या उमेदवार  आ. श्वेताताई महाले  यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जन आशीर्वाद दौऱ्याला दौऱ्याचा अखेरचा टप्पा सुरू आहे. आजवर भेटी दिलेल्या गावांप्रमाणेच १४  नोव्हेंबर रोजी झालेल्या केळवद जिल्हा परिषद सर्कलमधील  प्रचार दौऱ्याला सुद्धा मतदारांकडून भरघोस पाठिंबा मिळाला.  श्वेताताई महाले यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निश्चय येथल्या  बहुसंख्य मतदारांनी आत्ताच करून ठेवला असून  ते फक्त २०  नोव्हेंबरच्या मतदानाची वाट पाहत आहेत याची प्रचिती दि. १४  नोव्हेंबर रोजी केळवद  जिल्हा परिषद सर्कलमध्ये झालेल्या जन आशीर्वाद दौऱ्यादरम्यान आली. 
                 चिखली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जन आशीर्वाद दौऱ्यांमध्ये आ. महाले यांनी १४  नोव्हेंबर रोजी केळवद जिल्हा परिषद सर्कलमधील भानखेड, बेराळा, येवता, जांभोरा, गिरोला, वाडी ब्रह्मपुरी, केळवद  आणि किन्होळा या गावांना भेटी दिल्या.  या गावभेटीदरम्यान प्रत्येक गावात श्वेताताईंचे उस्फूर्त असे स्वागत झालेले आढळले  आणि   जागोजागी आ. श्वेताताई महाले यांनी केलेल्या मूलभूत सोयी सुविधांची उपलब्धता आणि विकासकामांचा उल्लेख प्रत्येक गावातील रहिवाशांकडून होत असताना पाहायला मिळाला. 

विकासकामांची आहे मतदारांना जाणीव

         आ. श्वेताताई महाले यांनी  केवळ अडीच वर्षाच्या अत्यल्प काळात संपूर्ण चिखली मतदारसंघातच हजारो कोटी रुपये निधी आणून अनेक भरीव विकास कामांचा पाया घातला. केळवद सर्कलमध्ये सुद्धा आ.  महाले यांनी आजवर कधीही झाली नव्हती एवढी विकास कामे केली. प्रत्येक गावात अंतर्गत रस्ते, शेत रस्ते, दोन गावांना जोडणारे रस्ते, विद्युत रोहित्र, स्मशानभूमीची कामे, बस थांबे, सामाजिक भावनांची निर्मिती, गावातील मंदिरांना सभामंडप, समाज भावनांची बांधकामे, व्यायाम शाळांची बांधकामे, अंगणवाड्यांच्या इमारती, जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना, अंतर्गत सिमेंट रस्ते, याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्ग खोल्या बांधकामासाठी निधी अशी कितीतरी कामे सांगता येतील की ज्या कामांमुळे ग्रामीण भागातील चित्र पालटायला सुरुवात झाली आहे. ही विकासाची प्रक्रिया यापुढे सुद्धा अविरत सुरू असावी अशीच  मतदारांची प्रबळ इच्छा असून त्याकरिता श्वेताताईंनाच  पुन्हा संधी देण्याची मानसिक तयारी ग्रामीण भागातील मतदारांनी केली आहे. एकूणच काय कर श्वेताताईंच्या  विकासकामांची जाणीव ठेवून यंदा सुज्ञ मतदार  आपले मतदान करणार आहेत हे निश्चित.

Previous Post Next Post