ठाणेदार संग्राम पाटील यांची धडक कार्यवाही
माजी नगरसेवकासह दिग्गजांना जुगार खेळताना पकडले
चिखली:- कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर विधानसभा निवडणूक काळात होते. निवडणुका शांत वातावरणात पार पाडल्याने पोलिसांनी सुटकेचा मोकळा श्वास 23 नोव्हेंबर रोजी घेत न घेत तोच लगेच २५ नोव्हेंबर सोमवारला सायंकाळी सात वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चिखली पोलिसांनी जाफराबाद रोडवरील नगर पालिकेची श्री व्यंकटेश बहुउद्देशीय सामाजिक क्रीडा व शिक्षण संस्था येथील व्यायाम शाळा जी तुषार बोंद्रे यांच्या ताब्यात होती तेथील वरील रूम मध्ये धाड टाकून तब्बल 15 आरोपी यांना ऐक्का बादशहाचा प्रतिबंधित जुगार खेळताना रंगेहात पकडले. यामध्ये एक माजी नगरसेवक व इतर दिग्गज होते. त्यांच्याकडून १,१५०५० रूपये किमतींचा मुद्देमाल जप्त करून,अपराध क्रमांक ९३०/२०२४ महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम ४ व ५ नुसार रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सविस्तर असे की चिखली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चव्हान यांचेसह टीम पो.ना.अमोल गवई,पो.कॉ. प्रशांत धंदर,पो.कॉ. पंढरीनाथ मिसाळ, पो.कॉ. रोहिदास पांढरे,पो.कॉ. राहुल पायघन,पो.कॉ. निलेश सावळे,पो.कॉ.केसकर,पो. कॉ. सुनील राजपूत पो. कॉ. सागर कोल्हे, म. पो.कॉ. माया सोनवणे यांनी जाफराबाद रोड स्थित व्यायाम शाळेवरील रूममध्ये रेड केली असता माजी नगरसेवक अब्दुल रफिक,श्रीकांत टेहरे,जितेंद्र राउत,शंकर तायडे,एकनाथ सुरडकर
राजेंद्र जैन,शिवाजी सुरडकर,सुधिर गवई,परेश्वर गवारे,संतोष जाधव,आजम खान मौजम खान,जितेंद्र रुपारेलीया,कुणाल रुपारेलीया,मनोज रुपारेलीया,शेख जमील शेख खलील हे येक्का बादशा हा जुगार खेळताना मिळून आले.यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाऊनी नीतींनसिंह चव्हाण हे करीत आहेत.
*संग्राम पाटील - पोलीस निरीक्षक पो.स्टे.चिखली*
पोलीस स्टेशन येथे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की चिखली शहर येथील जाफराबाद रोड या ठिकाणी असणारे इसम नामे तुषार बोंद्रे यांची जिम मध्ये काही इसम हे ऐक्का बादशा नावाचा जुगार खेळत असल्याची बातमी मिळाली, तात्काळ पोलीस स्टेशनचे पीएसआय चव्हाण व इतर अंमलदार यांना सदरील ठिकाणी जाऊन छाप मारण्याचे आदेशित केले. दरम्यान सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान छापा टाकल्यावर तेथे पंधरा इसम ऐक्का बादशा नावाचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून नगदी व मोबाईल असा ऐकून १,१५०५० रूपये किमतींचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
*प्रशांत बिडगर मुख्याधिकारी न. प.चिखली*-
आरबी फिटनेस क्लब वर नगरपालिकेने दिलेल्या भूखंडाचा गैरवापर केल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने ती जागा सिल करून आपल्या ताब्यात घेतली आहे. प्रल्हाद पद्मजी शर्मा यांच्या मालकीच्या लेआउट मधील शेत सर्वे क्रमांक १४६/१ मधील नगरपरिषदेचे आरक्षित भूखंड क्षेत्रफळ ११३४ चौरस मीटर पैकी दहा टक्के जागा म्हणजे १३.४५ चौरस मीटर जागा ही १४/९/२०१० च्या सभेच्या ठरावा अन्वये श्री व्यंकटेश बहुउद्देशीय सामाजिक क्रीडा व शिक्षण संस्था चिखली यांना नऊ वर्षांकरिता व्यायाम शाळा या उपयोगासाठी उपलब्ध करून दिली होती. परंतु सदर ठिकाणी २५ नोव्हेंबर रोजीपोलीस कारवाईमध्ये त्या ठिकाणी जुगार खेळताना काही ईसम आढळून आले आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे. त्यामुळे सदर जागेचा होणारा दुरुपयोग बघता सदर ठराव हा रद्द करण्यात आलेला आहे आणि ती व्यायाम शाळा नगरपालिकेच्या ताब्यात घेतली,आणि त्या ठिकाणी सिल लावण्यात आलेले आहे.
Tags
जुगार रेड....