जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा ....

समाज कल्याण कार्यालयात संविधान दिन साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि. 26: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात व कार्यालयाच्या अधिनस्त समाजकार्य महाविद्यालय, तसेच अनुसूचित मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळा व मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये संविधान प्रस्ताविकाचे वाचन करणे, संविधानाबाबत जनजागृती, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये इत्यांदी विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आले होते. जिल्हास्तरावरील संविधान दिन कार्यक्रम हा महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येळगांव व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालय येळगांव येथे आयोजित करून साजरा करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी रॅली काढण्यात आली. कलापथकाच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी-कर्मचारी, नागरीक, महिला, विद्यार्थी यांचेसह एकत्रित संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हरिश साखरे हे होते. तर नंदकुमार गायकवाड, सुरेश जाधव, संदिप कपले, रणजित सोळंके, गणेश कपले आदींची प्रमुख उपस्थिती होते. या कार्यक्रमांचे प्रास्तविक सतिश बाहेकर यांनी केले. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून संदिप कपले, नंदकुमार गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानामध्ये संविधान दिनाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अविनाश गेडाम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येळगांव व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा येथील कर्मचाऱ्यांनी मोलाची भुमीका बजावल
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन बुलडाणा, (जिमाका) दि. 26: संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, उपजिल्हाधिकारी सुरेश खरात यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मूल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी अपर जिल्हाधिकारी श्री. शेलार यांनी उपस्थितांना माहिती दिली.
Previous Post Next Post