सिल्लोड मतदार संघात अब्दुल सत्तर यांच्याविरोधात पुन्हा एकदा सगळे एकत्र आल्यांचं दिसतंय. गेल्या तीन पंचवार्षिक इथे आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांच्या विजयाचं गणित मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधातला उमेदवार पडण्याची चिन्ह आहेत. या पाच मुद्द्यांमुळे लक्षात येतं की सत्तार विजयी घोडदौड कायम ठेवणार आहेत.
दानवे मैदानात उतरलेच नाहीत, कारण…
अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या गेल्या काही काळापासून वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालं. आपण विधानसभेच्या मैदानात उतरू शकतो असही ते म्हणाले, मात्र फक्त सिल्लोड तर सोडाच, पण ते विधानसभेच्या मैदानातच उतरले नाही, कारण त्यांना सत्तार यांचं यंत्रणा चांगलीच माहिती आहे.
विरोधक गाफील….
लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीला मिळालेलं यश महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलं. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवार विधानसभेलाही चित्र तेच असेल असं समजून गाफील आहेत. पण सत्तर यांचा इतिहास पाहिला तर ते विरोधात असलेल्या कोणत्याच लाटेदरम्यान पराभूत झालेले नाहीत. अगदी २०१४ ला मोदी लाट असतानाही सत्तार काँग्रेसमधून विजयी झाले होते.
सत्तार यांचं नेटवर्क
सिल्लोड मतदार संघातले सगळे गावं अब्दुल सत्तर यांच्या नेटवर्कमध्ये बांधलेले आहेत. या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अब्दुल सत्तार यांचं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. त्यामुळे कितीही कुणाची लाट आली, तरी जुनी माणसं आपल्या विश्वासाचा माणूस म्हणून सत्तार यांच्याकडे पाहतात.
धर्मनिरपेक्ष चेहरा
अब्दुल सत्तार यांच्यावर अनेकदा जाती-धर्माच्या नावाने आरोप करण्यात आले, त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. पण विधानसभा निवडणुकांचा इतिहास काढून पहिला तर अशा कुठल्याच मुद्द्यांचा परिणाम त्यांच्या मतांवर झाला नाही. याचे कारण एकच… अब्दुल सत्तार यांच्या डोळ्यावर कधीच जातिभेदाचा, धर्मभेदाचा चष्मा नव्हता. त्यामुळे ते नेहमीच सर्वांना जवळचे वाटत आले आहेत.
मंत्रिपदाच्या काळातील कामे
अब्दुल सत्तार यांची बार्गेनिंग पॉवर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेकजण मुंबईत तळ ठोकून होते, पण सत्तार यांनाच मंत्रीपद मिळालं. त्यांची हीच पॉवर मतदारसंघात निधी खेचून आणण्यासाठीही ते करतात. तसंच मंत्रालयात त्यांच्या शब्दाला वजन असल्याने लोकांची कामही होतात. त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज नसते.