Khabarbat News- चिखली येथे उपवर-वधू पालक परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

 




चिखली:- अखिल भारतीय माळी महासंघ व संत सावता माळी सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपवर-वधू पालक परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा (बुलडाणा/जालना/छत्रपती संभाजी नगर/नाशिक विभाग) या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर २० ऑक्टोबर मंगळवार रोजी विजय जागृत माजी आरोग्य सभापती न.पा. चिखली यांच्या हस्ते करण्यात आले. वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन २७ डिसेंबर २०२६ ला करण्यात येणार आहे. या वधू वर परिचय मेळाव्याचे ठिकाण  "कृष्णप्रिय" मंगल कार्यालय व लॉन, चिखली-जालना हायवे रोड चिखली, जि. बुलडाणा हे असणार आहे.

     यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक देशमाने, अध्यक्ष, मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था हे होते. सर्वप्रथम आयोजन समिती अध्यक्ष श्रीराम झोरे यांनी परिचय मेळाव्याच्या संबंधित सर्व माहिती दिली. या कार्यक्रमाला  दत्ता खरात,  अनिल जैवाळ, विजय राजाभाऊ खरात यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी आत्माराम देशमाने, पुंडलिकबापु राऊत, प्रकाश मेहेत्रे, देविदास सुरूशे, नारायणराव राऊत, राजेश उत्तमराव खरात, रवींद्र तोडकर,  प्रल्हाद बापू खरात, प्रल्हाद बांडे, गजानन अहिरे सर, भगवान जैवाळ, दिलीप मेहेत्रे ( राका ), राजेश्वर अवचार, डिंगाबर देशमाने, भरत खरात, सुभाष खरात सर, विष्णु सुरूशे, प्रल्हाद देशमाने, रमेश जैवाळ, शाम राऊत, भगवान गाडेकर, अंबादास खरात, गजानन गाभणे सर,भागवत भराड ( बाळुभाऊ ), सुधीर देशमाने  यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडु खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन अभय तायडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश द. मेहेत्रे, उमेश मोळवणे,नितीन फुलझाडे,प्रशांत जैवाळ ,दिपक सुरेश देशमाने, ज्ञानेश्वर मेहेत्रे, पप्पू जागृत, पवन तायडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post