Khabarbat News-*भानखेड येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी*




*रामायणकार आद्यकवी कोळी समाजाचे आराध्य दैवत भगवान महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम*

नितीन फुलझाडे 

*भानखेड (ता. चिखली) :* येथे दि. २३ रोजी रामायणकार आद्यकवी भगवान महर्षी वाल्मिकी यांची जयंती महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती, भानखेडच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


सकाळी युवकांनी भानखेड येथील महर्षी वाल्मिकी पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. सायंकाळी महिलांनी पुतळा परिसरात सडा-सारवण करून आकर्षक रांगोळ्या काढल्या. सायंकाळी ६:३० वाजता महर्षी वाल्मिकी पुतळ्याची भव्य महाआरती करण्यात आली, त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


आरतीनंतर गावातून महर्षी वाल्मिकी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गात महिलांनी दारोदारी पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी "जय वाल्मिकी 🚩 हर हर वाल्मिकी" च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.


महर्षी वाल्मिकी हे प्राचीन भारतीय परंपरेतील महान ऋषी, संस्कृत साहित्याचे आदिकवी आणि रामायण या महाकाव्याचे रचनाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षी आश्विन शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला त्यांची जयंती साजरी केली जाते. त्यांनी रचलेल्या रामायणाने भारतीय साहित्य, संस्कृती आणि समाजजीवनावर दीर्घकालीन प्रभाव टाकला असून प्रभू श्रीरामांचे जीवन, कर्तव्यनिष्ठा, सत्यपालन, त्याग आणि शौर्य यांसारखी आदर्श जीवनमूल्ये त्यातून समाजाला मिळाली.


या उत्सवास गावातील ज्येष्ठ नागरिक गोपीचंद इंगळे, प्रताप इंगळे, सुनील इंगळे, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राम सुरडकर, पोलीस पाटील डॉ. मिलिंद इंगळे, सरपंच पती राजू गायकवाड, उपसरपंच समाधान इंगळे, ग्रामपंचायत सदस्य बाळू इंगळे, राहुल इंगळे, नितीन इंगळे, प्रमोद इंगळे, गजानन देवकर, शरद इंगळे, आनंद देवकर, अमोल इंगळे, नितेश देवकर, विशाल इंगळे, आकाश इंगळे, शुभम इंगळे, रितेश इंगळे, श्याम इंगळे, यश इंगळे, मयूर मुरडकर, हर्षल इंगळे, मनोज इंगळे, तुषार इंगळे यांच्यासह महिला व तरुण मंडळाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Previous Post Next Post