*जनसेवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी*
चिखली:- वाढदिवस म्हटले की बॅनर, डीजे, मोठा खर्च... पण या सर्वांना फाटा देत नगरसेवक दीपक खरात यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. दि. २९ ऑक्टोबर रोजी येणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळून ती संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. सध्या राज्यावर असलेले दुष्काळाचे संकट आणि शेतकऱ्यांची होणारी परवड पाहता हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरत आहे.
*शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण - वृक्षवाटप योजना*
जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या काळात शेतकरी बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर *फळझाडे व देशी वृक्षांचे वाटप* करण्यात येणार आहे. कोरडवाहू जमिनीतही तग धरणारी, बांधावर लावता येतील अशी झाडे देऊन शेतकऱ्याला जोड उत्पन्न आणि पर्यावरण संवर्धन दोन्ही साध्य करण्याचा उद्देश आहे.
> "मी स्वतः शेतकरी कुटुंबातलाच आहे. वाढदिवस समाजाप्रती जबाबदारी जपण्याचा दिवस आहे. म्हणून हार, शाल, भेटवस्तू न आणता गरजूंना मदत करा." - *दीपकदादा खरात*
या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून कार्यकर्त्यांना हार, तुरे, शाल, भेटवस्तू न आणता आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*📞 जनसेवा प्रतिष्ठानच्या उपक्रम माहिती व मदतीसाठी संपर्क: 9881222546*

