Khabarbat News- मुंबई येथे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष समितीचा मोर्चा

 



नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे विजयकांत गवई यांचे आवाहन 


नितीन फुलझाडे 

      चिखली :- अनुसूचित जातीच्या एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या भूमीकेविरोधात संपूर्ण अनुसूचित जाती प्रवर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. सरकारच्या याच धोरणाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र अनुसूचित जातीचे मोर्चे व आंदोलने सुरू आहेत. या अन्यायकारक उपवर्गीकरणाच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी आणि अनुसूचित जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी येत्या 30 जून रोजी मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे विदर्भ प्रदेश सचिव विजयकांत गवई यांनी केले आहे. महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी  रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब, आ. राजकुमार बडोले व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या खंबीर नेतृत्वात 30 जून 2026 रोजी दुपारी बारा वाजता मुंबई येथे मेट्रो सिनेमा ते विधान भवन असा महामोर्चा काढण्यात येणार आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

Previous Post Next Post