Khabarbat News- महसूलमंत्री बावनकुळे यांच्या चिखली दौऱ्यात नागरिकांच्या समस्या सोडविण्याची संधी..

 


आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांचे जनतेला समस्या मांडण्याचे आवाहन..

चिखली:- राज्याचे महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे आज सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी चिखली येथे येत असून, सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत तहसील कार्यालय, चिखली येथे नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत. या दौऱ्यात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता महाले पाटील या महसूलमंत्र्यांसोबत उपस्थित राहणार असून नागरिकांच्या समस्या थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देवडे फार्म अँड ॲग्रो टुरिझमच्या उद्घाटनासाठी चिखली येथे येत आहेत. त्या दौऱ्याच्या अनुषंगाने, नागरिकांशी थेट संवाद साधण्याची ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बैठकीत महसूल, भूमी अभिलेख आणि इतर विषयांशी संबंधित लेखी निवेदने स्वीकारली जाणार आहेत.

आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, "महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या जमिनीच्या, भूमी अभिलेखाच्या किंवा इतर कोणत्याही महसूलविषयक समस्या थेट मांडण्याची ही दुर्मिळ संधी आहे. मतदारसंघातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपली लेखी निवेदने घेऊन उद्या तहसील कार्यालय, चिखली येथे उपस्थित राहावे."

नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, मंत्र्यांसाठी हार किंवा पुष्पगुच्छ आणू नयेत. केवळ लेखी निवेदनेच स्वीकारली जाणार असल्याने, नागरिकांनी आपल्या समस्या सुस्पष्ट लेखी स्वरूपात मांडाव्यात, असे आवाहन आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.
Previous Post Next Post