नितीन फुलझाडे
चिखली:- स्थानिक श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांचा 61 वा स्मृतिदिन 10 एप्रिल 2026 रोजी ७.३० वाजता विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंतकुमार चेके यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर भाऊसाहेब व इतर महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे आजीवन सदस्य तसेच शाळा समिती सदस्य सन्माननीय मधुकरराव पाटील, उपप्राचार्य गजेंद्र सिंह राजपूत, पर्यवेक्षक जयेश सावजी, शिक्षक प्रतिनिधी गजाननराव वायाळ ,कनिष्ठ महाविद्यालयीन प्रतिनिधी प्रा. हुसे सर, प्रा. भवार सर उपस्थित होते.
त्यानंतर कु. नंदिनी पवार व कु. ईश्वरी जाधव या विद्यार्थिनींनी भाऊसाहेबांच्या जीवन कार्यावर सविस्तर अशी माहिती आपल्या भाषणांमधून सांगितली.
त्यानंतर शाळेचे उपप्राचार्य गजेंद्रसिंह राजपूत यांनी आपल्या मनोगतामधून डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन कार्यावर आधारित शैक्षणिक सामाजिक, राजकीय कार्यावर आधारित सखोल असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेचे सन्माननीय प्राचार्य डॉ. अनंतकुमार चेके यांनी आपण भाऊसाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत व तो वारसा पुढे चालवणे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चिरखे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री भवार सर यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
