Khabarbat News- साकेगाव येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी; पंचक्रोशीतील भावी भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

 



चिखली (साकेगाव):-15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त साकेगावातील हेमाडपंती महादेव मंदिरात महाशिवरात्री मोठा उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली, तरुणाईचा उत्साह अन् भक्तिमय जल्लोष पाहण्यासारखा होता. प्राचीन काळातील हेमाडपंती महादेव मंदिर हे साकेगाव येथील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळ मानले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते, तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येथे हजेरी लावतात.महाशिवरात्र या पार्श्वभूमीवर या परिसरातील तरुणाईकडून भक्ती व परंपरेत रंग भरत एक वेगळा उपक्रम राबवला जातो.

    यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या भाविक भक्तांना फराळ वाटप करण्यात आले. तसेच दरवर्षी प्रमाणे  गावातील सर्व समाजातील  लोकं आपण होऊन वर्गणी स्वतःहून देतात.ही बाब उल्लेखनीय आहे.तसेच सोमवारला 16 फेब्रुवारी रोजी 12:30 ते 3:30 वाजेपर्यंत महाप्रसाद तयार करुन मोठा असा भंडारा करण्यात आला.

          खोर, माळशेंबा, साकेगाव,अंत्रीकोळी,वाघापूर,गोद्री, भोकर, कुसळी या पंचक्रोशीतील तरुणांच्या पुढाकाराने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी भक्तिगीते, कीर्तन, हर-हर महादेवच्या गर्जना, तरुणांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

या यात्रेत पंचक्रोशीतील सर्व समाजातील भाविक भक्तांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. भक्तिभाव, उत्साह आणि सामूहिक ऐक्याची झलक या यात्रेतून दिसून आली. यासाठी साकेगावातील हेमाडपंती महादेव मंदिर भक्त मंडळ साकेगाव यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post