Khabarbat News- कोलारा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर यशस्वीपणे संपन्न

 


नितीन फुलझाडे 

चिखली(कोलारा):- श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान कोलारा येथे साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज  समाधान शिबिर यशस्वीपणे आयोजित करण्यात आले.

            सदर शिबिरास ग्राम महसूल अधिकारी नितीन काळे, बद्रीनाथ वानखेडे,सुभाष वाकोडे, स्वाती व्यवहारे, अर्चना शिगणे, महसूल सेवक अनुप म्हस्के, सौ देव्हरे   यांच्यासह कोलारा मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, ग्राम महसूल सेवक, शेतकरी बंधू तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसूलविषयक तक्रारी व अर्जांची प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यक त्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची शासकीय आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, महसूल विषयक कार्यपद्धती तसेच शासकीय सेवांबाबत उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

            सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक  अनुप म्हस्के यांनी केले. प्रमुख मार्गदर्शनात ना तहसीलदार मुरलीधर गायकवाड  यांनी शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांची माहिती देऊन महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तत्काळ व पारदर्शक पद्धतीने निकाली काढण्याचा शासनाचा उद्देष स्पष्ट केला. त्यानंतर श्री अंकुशराव पडघान यांनी शिबिराबाबत महत्व विषद करून त्यांचा स्वतः अनुभव विषद केला. त्यानंतर कृष्णकुमार सपकाळ यांनी मार्गदर्शन केले.

            या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जी बी जाधव, मंडळ अधिकारी कोलारा यांनी समन्वय साधून विशेष परिश्रम घेतले. तसेच महसूल, आरोग्य, कृषी, पंचायत समिती, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, निवडणूक शाखा व इतर संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या विभागाच्या वतीने माहिती सादर करून सक्रिय सहभाग नोंदविला.

सदर महसूल समाधान शिबिरामुळे नागरिकांच्या विविध शासकीय कामकाजास गती मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post Next Post