Khabarbat News- अडत व्यापारी संघटनेचा अमरण उपोषणाचा कडक इशारा

  



कृषी उत्पन्न बाजार समिती सोडून इतरत्र अवैधरित्या शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करा 

नितीन फुलझाडे 

चिखली: कृषी उत्पन्न बाजार समिती येथील अडते व्यापारी शासनाच्या नियमाप्रमाणे शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय बाजार समितीच्या आवारात करतात.परंतु काही व्यापाऱ्यांनी एमआयडीसी चिखली येथे त्यांची व्यापारी प्रतिष्ठाने थाटली असून ते व्यापारी शासनाचा बाजार शेष व सुपरव्हिजन फी नियमित भरत नाही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच अवैद्य शेतमाल खरेदीविक्री व्यवहारांवर कारवाई करण्यात होत असलेल्या दिरंगाई विरोधात कृषी उत्पन्न बाजार समिती अडत व्यापारी कल्याणकारी बहुउद्देशीय असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली असून 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.





         चिखली M.I.D.C. परिसर तसेच अवैध शेतमाल खरेदीदार यांचे कडून बाजार शेष व शासनाची सुपरव्हिजन फी वसूल न केले बाबत, कृ.उ.बाजार समितीचे अडत व खरेदीचे परवाने घेऊन अवैध रित्या नियमित भुसार शेतमाल खरेदी करून बाजार समितीचा बाजार शेष व शासनाची सुपरव्हिजन फी न भरल्या बाबत मा. जिल्हा उपनिबंधक  यांचे पत्र जा.क्र.वि.4/कृ.उ.बा.स.चिखली/तपा. नाका/4628/2024 दि.31/12/2024 नुसार बाजार शेष व सुपरव्हिजन फी वसूल करण्यात कसूर केल्याबाबत. ज्या प्रमुख मागण्यांची मागील अनेक दिवसांपासून पूर्तता न झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अडत व्यापारी असोसिएशन द्वारा दिनांक २५ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. 

           जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की कृ.उ.बा. समितीचे परवाना धारक अडते व खरेदीदार  बाजार समितीचे आवारात अडते व वखरेदीदार खरेदीचा व्यवसाय बाजार समितीचे सर्व नियमानुसार करीत असून बाजार शेष व सुपरव्हिजन फी सुद्धा भरत आहे. परंतु काही व्यापारी हे बाजार समितीचे अडत व अ" वर्ग (खरेदी) परवाना घेऊन बाजार समितीमध्ये व्यापार न करता M.I.D.C. परिसरामध्ये नियमित शेतमालाच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. बाजार समितीने त्यांचेकडून कुठल्याही प्रकारचा बाजार शेष व सुपरव्हिजन फी वसूल केलेली नाही. तसेच बाजार समितीचा परवाना घेऊन M.I.D.C मध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन काही व्यापार्यांनी शेतक-यांची कोट्यावधीची आर्थिक फसवणूक याआधी केल्याचे प्रकार घडले आहेत, अशा प्रकारचे प्रकरण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा तसेच न्यायालयामध्ये सुद्धा न्यायप्रविष्ट असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

          शेतकन्यांच्या आर्थिक फसवणुक, बाजार शेष व शासनाची सुपरव्हिजन फी,M.I.D.C. परिसरातील व्यापारी बुडवीत आहेत. सबब त्यांचे परवाने रद्द करून उचित कार्यवाही करावी या मागण्यांसाठी 25 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post Next Post