दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा-डॉ.सय्यद उमर(वैद्यकीय अधीक्षक)

 



नितीन फुलझाडे 

चिखली:-  शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र नोंदणी शिबिर मा.आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने आयोजीत  केले आहे. या शिबिराचे उद्दघाटन दिनांक 14/10/2025 रोजी सकाळी 10:00 वाजता  ग्रामीण रुग्णालय चिखली येथे मा.आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे, तरी परिसरातील सर्व लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सैय्यद उमर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चिखली यांनी केले आहे.
Previous Post Next Post