डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याचे उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे गेले असता ते लंडन मधील ज्या घरात वास्तव्यास होते,ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर (10, किंग हेन्री रोड, लंडन), चे महाराष्ट्र सरकारने 2015 मध्ये सुमारे 35 कोटी रुपये खर्च करून विकत घेतले आणि त्या घराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बाबासाहेब यांच्या आठवणीशी संबंधित विविध वारशाचे संग्रहालय सुरू केले. त्या ठिकाणी आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे आणी सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत आमदार श्वेता महाले यांनी आज भेट दिली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी आपली सुमनांजली अर्पण केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा निवडणुकीपुरता वापर करून काँग्रेसने दीर्घकाळ सत्ता सांभाळली असली तरी बाबासाहेबांच्या लंडनमधील घराचे संवर्धन, त्याचे संग्रहालयात रूपांतर, याबाबत त्यांनी फारसा पुढाकार कधीही घेतला नाही.
बाबासाहेबांच्या वारशाचा सन्मान करण्यापेक्षा त्यांनी नेहरू परंपरेवर अधिक भर दिला. त्यामुळे या घराला राष्ट्रीय स्मारक म्हणून जपण्यासाठी काँग्रेसकडून लक्षणीय काम कधीही झाले नाही.
