पोळा सण, बैलांप्रती कृतज्ञता की कृतघ्नता...?
पोळा हा बैलांचा सण असून महाराष्ट्रासह सीमा लगतच्या राज्यात एक महत्वाचा सण म्हनून मोठ्या आनंदाने साजरा केल्या जातो.
विशेषतः विदर्भात खूप मोठ्या आनंदाने साजरा केल्या जातो.
शेती शेतकरी व बैल यांचं खूप अतूट घनिष्ट अस नात, शेतकऱ्याच्या कष्टाला बैलाची साथ व काळ्या मातीचा आशीर्वाद मिळाल्या शिवाय जागाच पोट भरणं शक्य नाही.
निसर्गाच्या कृपेने शेतकरी राजाला बैलाची साथ लाभल्याने पिकं शेतात डोलू लागतात,
शेत माळावर बहरलेले पीक पाहून आनंदित शेतकरी ज्या मुक्या प्राण्याने आपल्याला ऊन, वारा, पावसात साथ दिली अश्या बैलांप्रती कृतघ्नता व्यक्त करण्यासाठी किंवा उपकाराची जाणीव ठेवून एका दिवसासाठी का असोना सन्मान आदर व्यक्त करतो.
शेतकरी हा खूप दयाळू प्राणिमात्रावर प्रेम करणार, शेतातील पिकाला लेकरा प्रमाणे सांभाळ करणारा शेतकरी राजाला नांगरणी, पेरणी कोळपणी करतांना ज्या बैलाने उन वारा पावसात कष्टाने साथ दिली त्या आपल्या साथीदाराला शेतकरी राजा कधीच विसरू शकत नाही.
श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावस्येला बैलाच्या कृतज्ञता पोटी त्याचा सन्मान म्हनून पोळा सन साजरा केल्या जातो.
आदल्या दिवशी बैलाला आज आवतन उद्या जेवायला या असे मोठ्या आदराने आवतन (आमंत्रण) दिल्या जाते खांद मळन (वर्षभर कष्ट करून साथ देणाऱ्या शेतकरी मित्राला तेल हळदी ने ओझे उचलणाऱ्या खांद्या ची मालिश) करून जवळच्या तलावात, नदीवर अंघोळ घातल्या जाते, पोळ्याच्या दिवशी बैलांना नविन नाथन, कासरा, गळ्यात घागर माला, शिंगांना कलर, शिंगी, पाठीवर झुल, घातल्या जाते. अंगावर गेरू चे ठिपके मारून सुंदर सजवील्या जाते, गावातील ठराविक ठिकाणी आंब्यांच्या पानाचे तोरण बांधल्या जाते, काही ठिकाणी बैलांची धावण्याची शर्यत पण ठेवण्यात येतात. तोरण सोडल्यावर बैलांना महादेव मंदिरावर नेऊन देवाचे दर्शन झाल्या नंतर घरी महिला मोठ्या आदराने हळद कुंकू, लावून पायावर पाणी घालतात बैलाची विधिवत पूजा केल्या नंतर जेवण देतात तर वर्षभर बैलाची काळजी घेणाऱ्या माणसाला (घरगडी) भेट म्हनून नविन कपडे व पैसे देतात.
*#प्राणिमात्रावर दया प्रेम दाखविणारा हा सण भारतीय
सु-संस्कृतीचे दर्शन घडवितो.
दुर्दैव असे की काही ठिकाणी तोरणा खालून जाण्याचा पहिला मान मिळावा म्हणून स्पर्धा सुरू होते त्यातून किरकोळ वाद पण होतात.
तर काही संस्कृतीचा विसर पडून कृतघ्न झालेली लोक दारू पिऊन, बैलांना काठीने मारणे, शेपूट पिरगळणे व गावभर सुसाट वेगाने बैलांना पळविने असे लाजिरवाणे असंस्कृत कृत्य करत असतात.
ज्या गोवंशाशी संस्कृती व आस्था जुळलेली आहे अश्या शेतकऱ्यांच्या खऱ्या सारथीला पोळ्याच्या दिवशी सन्मान ऐवजी ही अघोरी वागणूक कृतज्ञता नव्हे तर कृतघ्नता असल्याचे दिसून #येते.*
*#परिणाम माहीत असूनही खेळल्या जाणारा जुगार म्हणजे #शेती*
तंत्र, यंत्राच्या युगात भारतीय शेतकरी पण वंशपरंगत कृषी व्यवसायात बदल करून आता तंत्र, यंत्राच्या सहाय्याने शेती मशागत करीत आहेत.
नाविन तंत्रज्ञान व यंत्राच्या सहाय्याने शेती केल्या जात असल्याने वेळची बचत व कमी कष्टात
शेती मशागत करणे सोयीस्कर झाले आहे.
शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने स्वतःच उदरनिर्वाह चालविणे अवघड झाले आहे अश्या परस्थितीत बैलांचा खर्च न परवडणारा झाल्याने
शेतकरी नाईलाजाने आता गोवंश पालनाकडे धजावत नाही.
परिणामी बैलांचे प्रमाण कमी झाले तरी शेतकरी आपली आस्था व संस्कृतीचा आदर करून
आजही शेतकरी त्याच सन्मानाने बैलांचा सण पोळा मोठ्या उत्साहात साजरा करतो.
काळ्या मातीची माया अन् सारथी बैलाची छाया सदैव बळीराजा सोबत राहो हीच पोळा सणानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
मुख्तार शेख..✍️
7057911311

