*नितीन फुलझाडे*
*चिखली:-* *भानखेड फाट्याजवळ हॉटेल कोल्हापुरी तडकाला एसटी महामंडळाने एसटी थांबण्यासाठी अधिकृत थांबा दिलेला आहे. या हॉटेलवर प्रवाशांची लूट होत असून, सदरील हॉटेलच्या मालकाची दादागिरी व अरेरावी तसेच स्वच्छता गृहाची दयनीय अवस्था या सर्व बाबींमुळे सदरील थांबा त्वरित रद्द करण्यात यावा असे निवेदन भारतीय मानवाधिकार संघटन बुलढाणा जिल्हाच्या वतीने विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभाग यांना प्रशांत डोंगरदिवे, जिल्हाध्यक्ष भारतीय मानवाधिकार संघटना बुलढाणा जिल्हा यांच्यावतीने 12 ऑगस्ट रोजी देण्यात आले आहे.*
*निवेदनात म्हटले आहे कि नागपूर ते छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील हॉटेल कोल्हापुरी तडका रेस्टोरेंट मु.पो भानखेड फाटा, चिखली जिल्हा बुलंढाणा या ठिकाणी प्रवाश्यांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या अधिकृत थांबा अत्यंत गैरसोयी व घाणेरडा,महाग व प्रवाशांना जेवणाचे डब्वे न खाऊ देणे अपघात प्रवण स्थळी असल्याचे निदर्शनात आलेले आहे.*
*सदर हॉटेल मध्ये MRP पेक्षा १० रुपयाने वस्तू महाग देतात व हॉटेल मध्ये आवश्यक तेवढी सुविधा नसल्यामुळे आपल्या बसेस ह्या मुख्य रोडवर मागे पुढे घेतल्या जातात. अशा वेळी भरधाव वाहणारी वाहने कुठल्याही स्पीड ब्रेकर शिवाय थांबावे लागते, या स्थितीत अनेकदा छोटे मोठे अपघात सुद्धा झाले आहेत. सदर ठिकाणी नियमित अपघात होत असतात. राज्य विभाग नियंत्रक, राज्य परिवहन यांनी सुद्धा विरुद्ध दिशेने गाड्या गेलेल्या आहेत तसेच मान्यता देत असताना घालण्यात आलेल्या विविध अटी व शर्तीची पूर्तता सुद्धा सदर ठिकाणी करण्यात आलेली नाही असे आपल्या अहवालात नमूद केले आहे.*
*सदर ठिकाणी शौचालय अत्यंत घाणेरडी आहे.अनेक वेळा प्रवाशी रोड क्रॉस करून शौचालयात जातात. सदर हॉटेलच्या मालकाकडून प्रवाशांना मारहाण व शिवीगाळ, वाहनचालक व वाहकास हॉटेलवर बस न थांबविल्यास उद्धट वर्तणूक केली जाते. विशेष म्हणजे याअगोदर देखील इतर तालुक्यातून निवेदने देऊन बऱ्याचवेळा हा हॉटेलचा थांबा रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे, परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणाने अद्यापही त्या हॉटेल थांब्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.या हॉटेलचे विडीवो, बातम्या अनेकवेळा वर्तमान पत्रामध्ये, सोशल मीडियावर पुराव्यासह आलेले आहेत. विरुद्ध बाजूला वाहने येत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे प्रकरण विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा यांनी गांभीर्याने घेऊन सदर हॉटेलचा एस.टी थांबा परवाना तत्काळ रद्द करावा, अन्यथा भारतीय मानवाधिकार संघटन बुलढाणा जिल्हाच्या वतीने लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी माननीय परिवहन मंत्री, महाव्यवस्थापक मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.*

