आमदार महाले यांचे तात्काळ सरसकट पंचनामे करण्याचे आदेश...
त्वरित मदत पुनर्वसन व पंचनामा करण्याचे कार्य सुरू करावे आमदार श्वेता महाले यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना...
नितीन फुलझाडे
संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली शहर व परिसरातील अनेक गावांमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत, काही ग्रामीण व शहरी भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे, आणि बऱ्याच गरीब मायमाऊल्यांच्या घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत आणि पिकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेशी फोनद्वारे चर्चा करून दोन दिवस सतत झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त भागामध्ये मदत व पुनर्वसन कार्य सुरू करण्यासंबंधी चर्चा केली तसेच चिखलीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, व मुख्याधिकारी यांना बाधित जनतेसाठी मदतकार्य पुरवण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या.
शासनाकडून तात्काळ मदत व पुनर्वसन सुरू होईलच बाधित भागाचे पंचनामे ही त्वरित सुरू होतील परंतु केवळ शासकीय मदत, पंचनामे याची वाट न पाहता आ. सौ. श्वेता महाले यांनी मतदारसंघातील सर्व शहरातील व ग्रामीण भागातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाहि विनंती केली आहे की, अशा कठीण प्रसंगात सर्वांनी जात, धर्म, पंथ,पक्ष अशी कुठलीही गोष्ट मनात न आणता फक्त भारतीय म्हणून रस्त्यावर उतरावे.आणि आवश्यकतेप्रमाणे व कुवतीप्रमाणे आपल्या भागातील नागरिकांची तन-मन, धनाने शक्य होईल ती मदत करावी असे आवाहन केले आहे ...
.....आवाहन....
संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली शहर व परिसरातील अनेक गावांमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत, काही ग्रामीण व शहरी भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे, आणि बऱ्याच गरीब मायमाऊल्यांच्या घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत, या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपले तहसीलदार, गटविकास अधिकारी, व मुख्याधिकारी यांना बाधित जनतेसाठी मदतकार्य पुरवण्यासंबंधी सूचना करण्यात आलेल्या आहेतच, शासनाकडून तात्काळ मदत व पुनर्वसन सुरू होईलच बाधित भागाचे पंचनामे ही त्वरित सुरू होतील परंतु अशावेळी मतदारसंघातील सर्व शहरातील व ग्रामीण भागातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाहि माझी नम्र विनंती आहे की, अशा कठीण प्रसंगात आपण सर्वांनी जात, धर्म, पंथ,पक्ष अशी कुठलीही गोष्ट मनात न आणता फक्त भारतीय म्हणून रस्त्यावर उतरायचे आहे. आणि आवश्यकतेप्रमाणे व कुवतीप्रमाणे आपल्या भागातील नागरिकांची तन-मन, धनाने शक्य होईल ती मदत करायची आहे...
आपली विनम्र लोकप्रतिनिधी...
*आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील*,
चिखली विधानसभा मतदारसंघ,
बुलढाणा.
