अमरावती विभागातून उत्कृष्ट तहसीलदार म्हणून संतोष काकडे सन्मानित






नितीन फुलझाडे 
चिखली : येथील तहसीलदार संतोष काकडे यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मान्यतेने विभागीय आयुक्तांकडे जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून गौरव करण्यासाठी नामनिर्देशन करण्यात आले होते. 
     यात तहसीलदार संतोष काकडे यांनी जिल्ह्यामधून बाजी मारली असून, त्यांनी या संदर्भातील निकष पूर्ण केले आहेत म्हणून त्यांची उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड करण्यात आली तसेच माननीय विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी त्यांचा गौरव करण्यात आला.   


*चिखली तालुका पत्रकार संघातर्फे तहसीलदार संतोष काकडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.* *यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे,सचिव महेश गोंधणे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे, इफ्तेखार खान, रमिज राजा उपस्थित होते.*



....,.................................................




              तहसीलदार संतोष काकडे यांचे माहिती तंत्रज्ञानदृष्ट्या ज्ञान अद्ययावत असून, त्याचा दैनंदिन कामकाजात त्यांनी समावेश केला आहे.प्रशासन गतीमान करण्याकरिता नवनवीन संकल्पना त्यांनी राबविल्या.दाखले देण्यासाठी व शिबिरे घेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. नियम, कायदे, परिपत्रके, शासन निर्णय इत्यादीचा दैनंदिन कामकाजात त्यांनी भरपूर वापर केला. ७/१२ संगणकीकरणाचे कामकाज अद्ययावत करण्याकरिता ते प्रयत्नशील राहिले. जिवंत सातबारा ही मोहीम त्यांनी चिखली तहसीलला सुरू केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ती योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली हे विशेष.त्यांनी आपातकालीन परिस्थितीमध्ये तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता विशेष प्रयत्न केले.यामुळे संतोष काकडे यांची उत्कृष्ट कामासाठी निवड करण्यात आली. पांदण रस्ते खुले करणे,शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत त्यांनी विशेष कामगिरी केली आहे.अनाधिकृत बांधकामांना आळा बसविण्याच्या दृष्टीने कामगिरी केलेली आहे. न्यायालयीन व दंडाधिकारीय कामे त्यांनी सक्षमपणे व विहीत कार्यपद्धतीने हाताळली. त्यांच्या या कामगिरीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.



Previous Post Next Post