राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत बुलढाण्याच्या प्रांजलचे सुयश



नितीन फुलझाडे 
बुलढाणा, 1 जुलै  ः राजधानी दिल्ली येथे 26 व 27 जुन रोजी पार पडलेल्या महिलांच्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील प्रांजल प्रविण नरवाडे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत 17 वर्षीय वयोगटातील मुलींमधुन संपूर्ण भारतातून तिसरे स्थान पटकाविले आहे.
प्रांजल अवघ्या 13 वर्षाची असून ती बुलढाणा जिल्ह्यातील शिवण आर्चरी अ‍ॅकडमीमध्ये चंद्रकांत इलग सर यांच्याकडे धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेत आहे. तिने तिचे यशाचे श्रेय तिचे प्रशिक्षक इलग सरांना दिले असून भविष्यात चांगली कामगिरी करण्याचा तिचा मानस आहे. या अगोदर प्रांजलने शालेय नॅशनल व असोसीयशन नॅशनलचे सुध्दा मेडल प्राप्त केले आहे. ती 2 वेळा नॅशनल व 2 वेळा स्टेट विनर राहिलेली आहे. या स्पर्धेत तिला प्रमाणपत्र व रोख पारितोषीक बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.
ह्या विजयानंतर तिला पुढील 3 वर्षासाठी ‘खेलो इंडिया’ भारत सरकार तर्फे स्कॉलरशिप पण सुरु झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरुन तिचे कौतूक होत आहे.
Previous Post Next Post