महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 


नितीन फुलझाडे 

चिखली:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ , गट कार्यालय अकोला अंतर्गत कामगार कल्याण केंद्र चिखली येथे 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 15. 6 .2025 ते 21 .06. 2025 पर्यंत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण आयुर्वेद महाविद्यालय चिखली असून प्रशिक्षक डॉ. दिपक खेडेकर आयुर्वेदाचार्य व योग चिकित्सक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी केंद्र परिसरातील तसेच कामगार व कामगार कुटुंबीयांनी "योग प्रशिक्षण " शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन कामगार कल्याण मंडळ चिखली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post