हा क्षण भावनिक, शिक्षण व तंत्रज्ञान यांच्या परिसस्पर्श होऊन विद्यार्थी जीवनाचे सोने होऊ दे... आ. सौ श्वेताताई महाले.
नितीन फुलझाडे
आज विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 50 लक्ष रुपयांच्या कम्प्युटर लॅब चे उद्घाटन करताना जेवढा आनंद होतोय त्या आनंदा मागे थोडीशी कष्टमय पार्श्वभूमी असल्याने हा आनंद कित्येक पटीने मोठा वाटतोय, असे आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी अमडापुर येथील लॅब मध्ये ज्यावेळेस या लॅब ची मागणी करण्यात आली या लॅब साठी नियमानुसार आवश्यक असलेली जागा शाळेकडे उपलब्ध नव्हती. त्यावर उपाय म्हणून येथील शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने इथे बांधलेल्या दोन वर्ग खोल्यांचे एकत्रीकरण करून नियमानुसार लॅबला गरजेची असलेली जागा उपलब्ध करून दिली पण वर्ग खोल्यांचे रूपांतर लॅब मध्ये केल्यामुळे आता वर्गखोल्यांची कमतरता भासू लागली तेव्हा गावातील अतिशय गरीब वर्गातील, अतिशय कमी उत्पन्न वर्गातील मुले या शाळेमध्ये शिकत असताना देखील पालकांनी लोकवर्गणीतून शाळेला वर्ग खोलीची उपलब्धता करून दिली.
कृतीतून शिक्षणाचे महत्त्व जाणत असलेल्या सुज्ञ पालकांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या मजुरीतून जो पैसा उभा करून दिला त्याची सर करोडो रुपयांच्या अनुदानाला देखील येणार नाही. त्यामुळे या कम्प्युटर लॅब चे उद्घाटन हे केवळ भौतिक दृष्टीने नाही तर भावनिक दृष्टीने ही खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे या कम्प्युटर लॅबच्या माध्यमातून शिक्षण व तंत्रज्ञान यांचा परिसस्पर्श होऊन या विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने व्हावे, अशी प्रार्थना मी अमडापूरच्या "बल्लाळ देवीला" करते असे आमदार श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.
आजची पिढी सोशल मीडियामुळे विविध विषयात जागृत झाली असल्याने विद्यार्थी घडवितांना तो अधिक परिपूर्ण कसा होईल याकरिता शिक्षक जाधव सर व शिक्षिका शितोळे मॅडम शाळेत नेहमी अपडेट राहिल्याने व विद्यार्थी,पालक, शाळा समिती, ग्रा.पं. सरपंच आणि समाज यांनी तुलनात्मक विचार केल्याने शिक्षकांनी शैक्षणिक दर्जा अधिक वृद्धिगत केला, विद्यार्थ्यांची पटसंख्या ३५वरून १०० पर्यंत गेली ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे आ. सौ. श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या.
अमडापूर येथील जि. प. मराठी कन्या शाळेच्या संगणक कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी तसेच नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दि.२३ जून सोमवार रोजी झालेल्या प्रवेशोत्सव प्रसंगी अमडापूर येथील जिल्हा परिषद शाळेत चिखली विधानसभेच्या आ. सौ. श्वेताताई महाले यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी गटविकास अधिकारी गजानन पोफळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद येंडोले, गटशिक्षणाधिकारी रमेश पाटील, गट समन्वयक प्रवीण वायाळ, सरपंच सौ. वैशालीताई गवई, मा. सरपंच ललिता ताई माळोदे, भाजपा अमरापुर मंडळ अध्यक्ष अमोल साठे, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत पाखरे,अध्यक्ष शाळा व्य. स.अरुण जाधव, उपाध्यक्ष शाळा व्य. स. मिताली जाधव, प्रवीण सेठ खंडेलवाल,विविध का. सो. अध्यक्ष गजानन चोपडे, प्रसाद देशमुख, भाजपा नेते बबनराव राऊत, योगेश जुमडे, रमेश देडे, राम देशमुख,प्रकाश निकाळजे, अक्षय आदबाने, अजमत टेलर, इमरान खान, रवी काळे, नितीन जाधव, प्रकाश खराडे, गजानन जाधव, दीपक झाडे, प्रवीण माळोदे, गणेश माळोदे, पवन दायजे,पालक, माता-भगिनी, विद्यार्थी, शिक्षक वृंद, शाळा व्य. स. सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम जाधव यांनी केले तर आभार शेडगे मॅडम यांनी मानले.

