चिखलीत क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; बालकांचा सहभाग आणि पुतळ्यांचा रथ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

 


चिखली (प्रतिनिधी) – चिखली शहरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली, तर सायंकाळी शोभायात्रेने संपूर्ण वातावरण ढवळून निघाले.
या शोभायात्रेतील विशेष आकर्षण ठरला महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे असलेला रथ. फुलांनी सजवलेला हा रथ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेल्या लहान बालकांनी शोभायात्रेत सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उपस्थितीने शोभायात्रेला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली. बालकांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या जीवनमूल्यांचा प्रसार आपल्या उपस्थितीतून साधला.

शिस्तबद्ध शोभायात्रा, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारी नागरिकांची उपस्थिती, आणि महापुरुषांप्रती असलेली निष्ठा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.महात्मा ज्योतीराव फुले जयंती निमित्त चिखली शहरात संपूर्ण दिवसभर एक प्रेरणादायी आणि चैतन्यदायी वातावरण अनुभवायला मिळाले.
Previous Post Next Post