फायटरने मारहाण; आरोपी प्रिन्स उर्फ केदार जैस्वाल विरोधात गुन्हा दाखल

 

(नितीन फुलझाडे)


चिखली: येथील बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या अपराजित मेडिकल स्टोअर्स समोर एका व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आदित्य प्रशांत गुप्ता (वय 34) यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

गुन्हा क्रमांक 85/2025 नुसार, आरोपी प्रिन्स उर्फ केदार प्रशांत जैस्वाल याच्या विरोधात कलम 118(1), 296 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आदित्य गुप्ता हे त्यांच्या मुलीच्या औषधासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेले होते. त्यांची गाडी काढत असताना आरोपी प्रिन्सने त्यांना शिवीगाळ केली आणि हातातील फायटरने डोक्याच्या मागच्या बाजूला मारून जखमी केले. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

ही घटना 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 10.30 च्या दरम्यान घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

      सविस्तर असे कि आदित्य प्रशांत गुप्ता हे बसस्टँड जवळील अपराजित मेडिकल स्टोअर्स येथे त्यांच्या आजारी मुलीसाठी औषधी घेण्यासाठी दुचाकीने गेले होते.विशेष म्हणजे त्यांची लहान मुलगी देखील त्यांच्या सोबत होती.मेडिकल मधून गुप्ता हे घरी परत जाण्यासाठी निघाले तितक्यात त्यांच्या पाठीमागून प्रिन्स उर्फ केदार प्रशांत जैस्वाल हा त्याचे मोरीस कार घेऊन आला, लगेच तो गाडीतून उतरून “जल्दी गाडी निकाल” म्हणत अश्लील शिवीगाळ करू लागला.गुप्ता यांनी प्रतिकार करत “तोंड सांभाळून बोल” असे म्हणताच जैस्वाल रागाने गुप्ता यांच्या डोक्यावर पिवळ्या धातूचे फायटरने सपासप वार करू लागला.तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन “मेरा कोई कूच नही बिगाड सकता” अशी अरेरावी केली.
Previous Post Next Post