बुलडाणा -
सद्भावना सेवा समिती आणि सिंहनाद सेवा संघ द्वारा आयोजित संगीतमय बुध्द चरित्र कथेचे दि.३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत सहकार विद्या मंदिर मध्ये आयोजन केले आहे. महापंडीत सध्दर्याचार्य भिक्षु प्रियदर्शी थेरोजी पाली बौध्द साहित्याचे प्राध्यापक, केलानिया युनिव्हसिटी श्रीलंका तिन दिवस बुध्द चरित्र कथा प्रवक्ता आहेत. प्रथम दिवशी बोधीसत्वच्या जन्मापासून महाभिनिष्क्रमण द्वितीय दिवशी कठोर तप आणि बोधिकथा तृतीय दिवशी प्रथम उपदेश आणि भगवंताची महिमा या विषयावर प्रियदर्शी थेरोजी बुध्द कथेचे अमृतवर्षा करणार आहे. थेरोजी यांचा गाढा अभ्यास, विद्वता व साधना एवढी प्रचंड आहे की, ही बुध्द चरित्रांमृत कथा हृदय परिवर्तन करण्यास सक्षम आहे, असे भावोद्गार सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले.सिंहनाद सेवा संघ आणि सदभावना सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाईजी यांनी आपले विचार मांडले व जनतेला कथा श्रवण करण्याचे आवाहन केले. कथेची वेळ सकाळी ११ ते १ राहणार असून वयोवृध्द नागरिकांसाठी शहराच्या मुख्य चौकातून सहकार विद्यामंदिर पर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात येईल, अशा प्रकारची संगीतमय बुध्द चरित्र कथा प्रथमच बुलडाणा शहरात होत आहे, अशी माहिती राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी दिली.सर्व श्रोत्यांनी कथला पांढरीशुभ्र वस्त्र परिधान करुन यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. सिंहनाद सेवा संघ व सदभावना सेवा समितीचे पदाधिकारी विजय वाकोडे, गजानन जाधव, सुहास गवई, शिवाजीराव गवई, दादाराव पगारे, प्रशांत इंगळे, सुनील जाधव, सिध्दार्थ शर्मा, सुरेशचंद्र गट्टाणी, श्री. घीरके,दिलीप जाधव, सुमीत सरदार, शैलेश भंडारे, निवृत्ती सरकटे, सोनाजी दाभाडे यांनी भाईजीसोबत चर्चा करुन कार्यक्रमा विषयीच्या तयारीचा आढावा घेतला. वरील सर्व कार्यकर्त्यासोबत चंपालाल शर्मा, विजय सावजी, राजेश देशलहरा, उमेश मुंदडा, तिलोकचंद चांडक, प्रा. प्रकाशचंद्र पाठक, सुभाष दर्डा, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
सद्धर्माचार्य साधू प्रियदर्शी थेरो जी यांचा संक्षिप्त परिचय
पाली बौध्द साहित्य, संस्कृत बौध्द साहित्याचे प्रकांड पंडीत केलानिया विद्यापिठात प्राध्यापक, नागपूर विद्यापीठातून बी.ए. बनारस हिन्दू विश्व विद्यालयातून पाली साहित्यात एम.ए. संम्पूर्णानंद विद्यापीठ मधून बौध्द दर्शनात आचार्य पदवी, हाँगकाँग विद्यापीठ मधून एमबीएस. सध्दर्माचार्य (सूत्र पिटक) विद्योद्य महापरिवन श्रीलंका, विपश्यना व योगमध्ये कोलंम्बो विश्वविद्यालय पी.एच.डी. अनेक पदव्यामध्ये सुवर्ण पदके, हाँगकाँग विद्यापीठाचे जी.एस.जी. अवार्ड, डॉ. आंम्बेडकर डेव्हलपमेंट सोसायटीचे धम्म प्रवचक अवार्ड, द बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडीयाचे धर्म भूषण अवार्ड, श्रीलंका मलेशिया, हाँगकाँग, चीन, म्यानमार, पाकीस्तान, थायलंड इ. विदेश भ्रमण करुन प्रवचने.
Tags
बुलडाणा....