आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांचा केला सन्मान

 



नितीन फुलझाडे 
देऊळगाव राजा :-  देऊळगाव राजा नगरपरिषद मधील कार्यरत कर्मचाऱ्यापैकी विविध विभागात काम करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना नगर विकास विभागाचे आदेशाने बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिनांक 19/12/24 रोजी मंजूर केला असून प्रत्यक्ष वेतनामध्ये त्यांचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ मिळालेल्या 15 कर्मचाऱ्यांचे वतीने दिनांक 24 जानेवारी 25 रोजी नगरपरिषद चे मुख्याधिकारी अरुण मोकळ पदोन्नती समिती मधील सदस्य विश्वजीत गवते लेखापाल ,एम.जे. शहा आस्थापना प्रमुख यांचा सुद्धा यशोचित सन्मान करण्यात आला.
          याबाबत सविस्तर असे की राज्य सरकारने यापूर्वीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा लागू केलेले आहे मात्र राज्यातील नगरपरिषद मध्ये काम करणाऱ्या संवर्ग कर्मचारी व इतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगातील आश्वासित प्रगती योजना (दहा,वीस,तीस वर्ष सेवा) चा लाभ देण्यात आलेला नव्हता यासाठी नगरपरिषद कर्मचारी संघटनेने वारंवार आंदोलने केल्यानंतर शासनाच्या नगर विकास विभागाने नगरपरिषद मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास मान्यता दिली मात्र ज्या तारखेपासून प्रत्यक्षात लाभ देणे बाबत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील पदोन्नती समिती मान्यता देईल त्याच तारखेपासून आर्थिक लाभ प्रत्यक्षात देण्यात येतील असे सूचीत करण्यात आले  त्यामुळे जरी जुन्या तारखेला जे जे कर्मचारी यासाठी पात्र ठरले आहेत त्यांना त्या त्या तारखेला त्यांच्या सेवा पुस्तकेत नोंद घेतल्या जाणार आहे व प्रत्यक्ष वेतनात त्याचा फायदा मान्यता जेव्हा मिळाली तेव्हापासून मिळणार आहे नगरपरिषद मधील कर्मचाऱ्यांना नेहमीच त्यांच्या हक्काचे आर्थिक लाभ मिळवून घेण्यासाठी तारेवरची कसरत करून आंदोलने केल्याशिवाय आर्थिक लाभ मिळत नाही शास्ती करताना मात्र  MCSR लागू असल्यामुळे शासन व नप प्रशासन मागेपुढे पाहत नाही व जेव्हा आर्थिक लाभ देण्याचा प्रसंग येतो तेव्हा वेगवेगळी कारणे दाखवत संघर्ष करायला भाग पाडतात दिनांक 24 जानेवारी 25 रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या त्या 15 कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचा तसेच पदोन्नती समिती मधील सदस्य विश्वजीत गवते व एम.जे. शहा यांचा सन्मान करण्यात आला.
Previous Post Next Post