प.पू. खटकेश्वर बाबांच्या जन्मोत्सवाचे आयोजन

४ ते ७ डिसेंबरदरम्यान महाप्रसादासह विविध कार्यक्रम चिखली : परमपूज्य श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा संस्थानच्या वतीने चिखली येथे दि. ४ ते ७ डिसेंबरदरम्यान 'श्रीं'च्या चार दिवसीय जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान विविध कार्यक्रमांसह शनिवार दि. ७ डिसेंबरला महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.परमपूज्य श्री संतसमर्थ खटकेश्वर बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने चिखली येथे श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचा प्रारंभ बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी होईल. यात सकाळी १० वाजता कलश पूजन, वीणा पूजन, ध्वजारोहणाने सुरुवात होवून ११ वाजता शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे. रात्री साडेआठ वाजता ह.भ.प. गाथामूर्ती अरुण महाराज घोराडे यांचे किर्तन होईल. त्यानंतर ह.भ.प. भिमराव महाराज पवार शास्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांचे भजन होईल.याशिवाय दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ४ वाजता काकडा, ८ वाजता विष्णूसहस्त्रनाम, दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान बंडु महाराज राऊत यांच्या वाणीतून संगीत भागवत कथा, सायं. ५ वाजता हरीपाठ, रात्री साडेआठ वाजता श्रीहरिकिर्तन व नंतर भजन असे कार्यक्रम होतील.
गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ह.भ.प.भरत महाराज पाटील यांचे किर्तन आणि त्यानंतर ह.भ.प. विलास खंदारे गुरुजी यांचे भजन होईल. शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ह.भ.प. अर्जुन महाराज खाडे यांचे किर्तन आणि नंतर शशिकांत आप्पा बेंदाडे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे भजन होईल.शनिवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पन्नालाल बगाडीयाव सौ. नीतादेवी बगाडीया आणि सुरेशआप्पा खबुतरे आणि सौ. स्नेहलता खबुतरे यांच्याहस्ते परमपूज्य श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा यांची पूजा व अभिषेक करण्यात येईल. यावेळी विविध साधुसंतांची तसेच मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी १० वाजता ह.भ.प.प.पू.. परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल. दुपारी २ वाजेपासून महाप्रसादाचे वितरणाला सुरुवात होईल.उपरोक्त संपूर्ण कार्यक्रमाला परिसरातील सद्‌गुरु भक्तांनी उपस्थित राहून सेवाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे आणि सर्व विश्वस्त मंडळाने केले आहे.
Previous Post Next Post