आमच्या बहिणीला मंत्रीपद मिळो,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाने चढवली सैलानिबाबा दर्ग्यावर चादर





चिखली:- विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला असून त्यांची मंत्री मंडळात वर्णी लागो यासाठी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष शेख अनीस शेख बुढण यांच्या उपस्थतीमध्ये  मुस्लिम समाजाचे भाजपा नेते,पदाधिकारी यांनी आज दिनांक ३ डिसेंबर रोजी सुफी संत सैलानी बाबा दर्ग्यावर चादर चढवून प्रार्थना केली.
             चिखली विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात प्रथमच करोडो रुपयांची विकास कामे करून सबका साथ सबका विकास या वृत्तीने आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी पहिल्याच टर्म मध्ये आपल्या कामाची पावतीच दिली आहे.त्यांच्या या विकासकामा ने प्रभावित होऊन मतदार राजा ने ही नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा त्यांना विधानसभेत पाठविले आहे.

आमच्या हक्काच्या बहिणीला आणखीन जोमाने विकास करण्यासाठी त्यांची मंत्री मंडळात वर्णी लागावी. यासाठी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चया वतीने जिल्हाध्यक्ष शेख अनीस शेख बुढन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ही सुफी संत सैलानी बाबा दर्ग्यावर चादर चढवून प्रार्थना केली.यावेळी त्यांचा समवेत हाजी मो.हनीफ मो. हाशम , नइम सौदागर, मुद्द सिर खान, सोहील जमदार,शोएब बागवान,याहाया खान,रेहान संजरी,शकील भाई सैलाणी,शफिभाई मुजावर,अजुभाई,नज्जू साहेब, जाहेद भाई, आलमगीर भाई,खालिक बागवान,सोहेलभाई मुजावर सैलानी,सोहेल कादरी ,शेख इम्रान ,शेख आलमगीर बागवान,शेख वाहिद बागवान,शेख इद्रिस बागवान,शेख शहजाद बागवान,शेख नुर बागवान यांच्यासह भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post