महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचे संकल्पक व भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे २६ नोव्हेंबर रोजी आ. श्वेताताई महाले यांनी मुंबईतील 'सागर' निवासस्थानी सहपरिवार भेट घेऊन विशेष अभिनंदन केले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्वेताताई महाले यांनी मिळविलेल्या विजयाबद्दल सत्कार करून पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी श्वेताताई महाले यांचे पती विद्याधर महाले व मुलगा राजन्य उपस्थित होते.