विधानसभा निवडणुक...... बुलडाणा जिल्हा...

*सातही मतदारसंघात उत्साहात मतदान; जिल्ह्यात अंदाजे 70.35 टक्के सरासरी मतदान*

• जेष्ठ व दिव्यांग मतदारांनी सुविधांचा लाभ घेत केले मतदान
• 23 नोव्हेंबरला मतमोजणी

*बुलढाणा, दि.20 (जिमाका):* जिल्ह्यातील सातही मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार सकाळी सात वाजतापासूनच मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाले. मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद देत सातही मतदारसंघात प्राप्त आकडेवारीनुसार अंदाजे सरासरी 70.35 टक्के मतदानाची नोंद झाली.
Previous Post Next Post