सर्वांगीण विकासकार्याला जनतेचा मिळतोय भरघोस प्रतिसाद..

चिखली : निवडणूक प्रचार म्हटला की, सर्व समाज घटकांच्या भेटीगाठी आणि प्रत्येकाशी संवाद साधून प्रत्येक  उमेदवार  आपली भूमिका समजावून सांगत असतो. याच प्रकारे चिखली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले या देखील आपले प्रचार कार्य करत आहेत. ग्रामीण भागातील आपल्या जन आशीर्वाद दौऱ्यादरम्यान गावोगावी जाऊन त्या मतदारांशी संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक  गावातील महामानवांच्या पुतळ्यांना श्वेताताई आवर्जून अभिवादन करतात. मागासवर्गीय वस्तीत असलेल्या तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर तसेच  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेसमोर  नतमस्तक होतात. आपल्या विकासकामांमधून मागासवर्गीय समाजाला यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न  करणाऱ्या श्वेताताईंनी या वर्गासोबत आपले भावनिक नाते जोडले असून प्रत्येक ठिकाणी श्वेताताई  महाले यांचे मागासवर्गीय समाजाकडून होणारे उस्फूर्त स्वागत याची साक्ष देत आहे.


     मागासवर्गीय वस्तीत रस्त्याची बांधकामे

            राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षात  श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा निधी आणला व त्या माध्यमातून प्रचंड विकासकामे केली. या विकासाच्या मुख्य प्रवाहात  त्यांनी मागासवर्गीय समाजाला देखील सहभागी करून घेतले. अंत्री कोळी, गोदरी, दहिद खुर्द, नायगाव बु, दुधा, धाड, धामणगाव, पळसखेड जयंती, घाटनांद्रा, आंधई, चांधई, तोरणवाडा, बोरगाव वसू, मकरध्वज  खंडाळा, मासरूळ, शिंदी  हराळी, शेलुद, सवना, सोनेवाडी, मौढाळा, मुंगसारी, रायपूर, वरूड, शेलुद, सोनेवाडी,  वाघापूर, सोमठाणा, आंधई, किन्होळा, कुंबेफळ, कुलमखेड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये अंतर्गत रस्त्याची बांधकामे, बौद्ध स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम  करून दलित बांधवांना  पक्या  रस्त्याची  मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली.

         संविधान भवन आणि सामाजिक भवनाची निर्मिती

             आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या विकासकार्यात कधीच भेदभाव केला नाही. शासनाची प्रत्येक योजना ही त्या त्या समाज घटकापर्यंत पोहोचवून जास्तीतजास्त लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कार्यकाळात केला.  करडी, करणखेड, कोलारा, खैरव, गोदरी, चांडोळ, जांब, तोरणवाडा,  दुधा, पांगरी  पांढरदेव, पेन सावंगी, म्हसला बु, सवना आणि साखळी बु  या गावांमध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये सभा मंडपाची बांधकामे, सामाजिक भावनांची निर्मिती व संविधान भवनाचे बांधकाम केले. या माध्यमातून स्थानिक मागासवर्गीय समाजातील बंधू-भगिनींना एक हक्काचे व्यासपीठ श्वेताताईंनी उपलब्ध करून दिले. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी कधीही एवढी कामे मागासवर्गी वस्तीमध्ये झाली नसल्याची प्रतिक्रिया या वर्गातील लोक व्यक्त करत आहेत.
Previous Post Next Post