आदर्श विद्यालय चिखली येथे संविधान दिन उत्सवात संपन्न

स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले सर यांच्या अध्यक्षतेखाली 26 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रथम भारतीय संविधानच्या प्रतिमेचे पूजन आदर्श विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले सर, उपप्राचार्य रामेश्वर कुटे सर , पर्यवेक्षक दंडे सर ,तायडे सर ,ज्येष्ठ शिक्षक शेटे सर यांच्या समवेत करण्यात आले.आदर्श विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले सर यांनी आपल्या भाषणामध्ये "राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे. जो सरकारचे अधिकार व मर्यादा आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांची रूपरेषा देतो .हा एक अत्यावश्यक दस्ताऐवज आहे जो देशाच्या शासनाची चौकट निश्चित करते. "हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले व संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुदर्शन मस्के याने भारतीय संविधान दिन बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. मुकेश भवर सर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रास्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फितवे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ वानेरे मॅडम यांनी केले.
Previous Post Next Post