दि. 30 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 21 लक्ष 34 हजार 500 असून यामध्ये पुरुष मतदार 11 लक्ष 9 हजार 791, महिला मतदार 10 लक्ष 24 हजार 671 तर तृतीयपंथी मतदार 38 आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : 21-मलकापूर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 50 हजार 56, महिला मतदार 1 लक्ष 38 हजार 326 तर तृतीयपंथी 6 असे एकूण 2 लक्ष 88 हजार 385 मतदार आहेत. 22- बुलढाणा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 452, महिला मतदार 1 लक्ष 47 हजार 638 तर तृतीयपंथी 16 असे एकूण 3 लक्ष 7 हजार 106 मतदार आहेत. 23- चिखली विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 57 हजार 170, महिला मतदार 1 लक्ष 48 हजार 546 तर तृतीयपंथी 2 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 718 मतदार आहेत. 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 68 हजार 601, महिला मतदार 1 लक्ष 54 हजार 393 तर तृतीयपंथी 1 असे एकूण 3 लक्ष 22 हजार 995 मतदार आहेत. 25-मेहकर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 378, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 578 तर तृतीयपंथी 4 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 960 मतदार आहेत.26- खामगांव विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 55 हजार 632, महिला मतदार 1 लक्ष 42 हजार 285 तर तृतीयपंथी 5 असे एकूण 2 लक्ष 97 हजार 922 मतदार आहेत. तर 27-जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 505, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 905 तर तृतीयपंथी 4 असे एकूण 3 लक्ष 6 हजार 414 मतदार आहेत.
जिल्ह्यातील सातही मतदारसंघात 85 वर्षावरील जेष्ठ मतदार 29 हजार 201, दिव्यांग 18 हजार 26 तर या निवडणूकीत प्रथमच मतदान करणारे 51 हजार 155 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.