*भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन रस्त्यावरच्या गोरगरिबांकडून घेतली जाणारी सक्तीची बैठक (कर वसुली) कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी.*
प्रतिनिधी:
चिखली शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. चिखली शहाराची बाजारपेट ही जिल्हयातील नामांकित बाजारपेठ म्हणुन ओळखल्या जाते. तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव आपला भाजीपाला चिखलीमध्ये विक्रीसाठी आणतात. परंतु चिखली शहरात भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला विक्रीसाठी कोणतीही जागा उपलब्ध नसल्या कारणामुळे त्यांना पारधी बाबा उद्यान परीसर, डी.पी रोडवर भाजीपाला विक्री करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय चिखली यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये नमूद चिखली नगर पालीक कडुन अतिक्रमण मोहिमेतील कर्मचारी तसेच बैठक वसुली कंत्राटदार संबंधित भाजीपाला विक्रत्यांसोबत, शेतकऱ्यांसोबत एखाद्या गुन्हेगांराप्रमाणे वागणुक देत त्यांना तेथुन उठवुन देत त्यांचा शेतमाल रस्त्यावर फेकुन देतात. यामुळे अनेक वेळा त्या ठिकाणी वादविवाद उपस्थित होत राहतात.
परंतु भाजीपाला विक्रीसाठी शहरात कोठेही जागा उपलब्ध नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांना नाईलाजास्तव रस्त्यावर भाजीपाला विक्री करावा लागत आहे.
त्यामुळे चिखली शहरात भाजीपाला विक्री करणाऱ्या नागरीकांना स्वतंत्र भाजी मंडी साठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. त्याच प्रमाणे सांयकाळचे वेळी काही क्षणांसाठी ग्रामिण भागातील शेतकरी एखाद्या थैली अथवा टोपल्यामध्ये आपला भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावर बसतात त्या शेतकऱ्यांकडुन व सण समारभांचे दरम्यान मुर्ती विक्रेते, नारळ विक्रेते, यांसह अन्य बेलपत्र, पानफुले विकणाऱ्या गोरगरीबांकडुन सत्कीची बैठक वसुली कायम स्वरुपी बंद करण्यांत यावी.
तरी वरील मागण्यांसह भाजी विक्रेत्यांचा प्रश्न येत्या १३ ऑगष्ट २०२५ पर्यंत निकाली न लागल्यांस दि.१४ ऑगष्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता आपले कार्यालया समोर आमरण उपोषणांस उपोषणाचा इशारा शहर अध्यक्ष नारायण आबा देशमुख यांनी दिला आहे.
त्यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, तालुका सचिव प्रवीण देशमुख, उपशहर अध्यक्ष रवी वानखेडे, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष अंकित कापसे उपस्थित होते.
